PMC Worker 7th Pay Commission | पुणे महापालिकेतील 15 हजार कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू, येत्या दोन-चार दिवसात ‘जीआर’ काढणार (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (PMC Worker 7th Pay Commission) लागू करण्याचा नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंदर्भातील जीआर काढणार असल्याचे आज झालेल्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचा (PMC Worker 7th Pay Commission) निर्णय आठवड्याभरात सोडवू असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते.

 

 

 

पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवार) ऑनलाईन बैठक घेतली.
अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde),
निलम गोऱ्हे (Nilam Gorhe), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol),
पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar), कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिली.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील थकबाकी पाच टप्प्यात देण्यात येणार आहे. ग्रेड पे बाबत जीआर (GR) आल्यानंतर समजेल. यामध्ये कोणत्या सूचना मान्य झाल्या हे देखील समजणार आहे.

सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर थकीत 525 कोटी रुपये पाच टप्प्यात दिले जाणार आहेत.
सध्या महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण 15 हजार 76 जण कार्यरत आहेत.
जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 नंतर निवृत्त झाले आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
शासनाने 30 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे.
सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1800 कोटी रुपये खर्च होत आहेत.
सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आता 2200 कोटी रुपये खर्च होणार आहे.
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी याच्या एकूण वेतनमध्ये 23 टक्क्यांची पगार वाढ झाल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे मनपातील कर्मचार्‍यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच निवेदन दिले होते.

 

सातव्या वेतन आयोगाच्या निर्णयावर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले…

“पुणे महापालिकेच्या जवळपास 17 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला ही अतिशय महत्त्वाची आणि समाधानाची बाब असून यासाठी आपण महापालिकेच्या मुख्यसभेकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता.
सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि त्यादृष्टीने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. महापालिका स्तरावर विविध टप्प्यांवर आम्ही याचा पाठपुरावा करुन विषय अंतिम मान्यतेसाठी नगरविकास खात्याकडे पाठवला होता.
या संदर्भात माझ्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारशी पत्रकारव्यवहार करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती.
त्याला अंतिम मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

 

Web Title : PMC Worker 7th Pay Commission | Seventh Pay Commission to be imposed on 15,000 employees of Pune Municipal Corporation, GR to be issued in next two-four days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrapur Crime | अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने नोकरीचे नियुक्तीपत्र, 22 बेरोजगारांची 1 कोटींची फसवणूक

Pradhan Mantri Kusum Yojana | ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शेतकऱ्यांसाठी महत्वाची; जाणून घ्या

Crime News | तेलंगणामध्ये चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या करणाऱ्या आरोपीचा मृतदेह आढळला