PMFBY | शेतकर्‍यांनी रब्बी पिकाचा 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावा विमा, अन्यथा मिळणार नाही लाभ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMFBY | केंद्र सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट (Farmers’ Double Income) करण्यासह पिकाशी संबंधीत अनेक योजना राबवते. यापैकी एक पंतप्रधान पिक विमा योजना (Pradhanmatri Fasal Bima Yojan) सुद्धा आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक संकटामुळे पिकाचे होणारे नुकसानीपासून संरक्षण (Crop Insurance) उपलब्ध करून दिले जाते. योजनेच्या अंतर्गत रब्बी पिकाचा विमा करण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2021 ठेवला आहे. (PMFBY)

 

अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी
शेतकर्‍यांनी आपल्या पिकाचा विमा 31 डिसेंबर 2021 पर्यंत करावा अन्यथा एखाद्या प्रकारचे नुकसान झाले तर त्यांना आर्थिक मदत मिळू शकणार नाही. या योजनेचा लाभ घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर विमा लाभ मिळणार नाही. पंतप्रधान पिक विमा योजना (PMFBY) आर्थिक वर्ष 2020-21, 2021-22 आणि 2022-23 च्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

 

पिक विम्यासाठी किती द्यावा लागेल प्रीमियम?
योजनेत अधिसूचित पिकांना नैसर्गिक आपत्ती रोखता न येणार्‍या इतर जोखमींसाठी पिक विमा उपलब्ध करून दिला जातो. शेतकर्‍यांना पीएम पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

 

रब्बीच्या प्रमुख पिकांमध्ये गहू, जव, मसूर, मोहरीसाठी 1.5 टक्के आणि बटाट्यासाठी 5 टक्के प्रीमियमचा दर ठरवला आहे.

पिकाचे नुकसान झाल्यास काय करावे?
पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत अंमलबजावणी एजन्सी/संबंधित बँक शाखा आणि कृषी व संबंधित विभागाला स्थितीची माहिती द्यावी लागेल. कोणत्याही माहिती साठी टोल फ्री नंबर 1800-889-6868 वर सुद्धा संर्प साधू शकता.

 

डिफॉल्टर शेतकरी सुद्धा पिक विमा काढू शकतात. त्यांचा विमा सुद्धा 1.5 टक्के प्रीमियमवर असेल. केंद्र आणि राज्य मिळून उर्वरित रक्कम भरतील.

 

शेतकर्‍यांना 100 रुपयांवर मिळाले 537 रुपये
पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरुवात 13 जानेवारी 2016 ला करण्यात आली होती.
जेणेकरून पिकांच्या होणार्‍या नुकसानीतून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसानीची जोखीम कमी करता येऊ शकते.

 

90 हजार कोटी रुपयांचा क्लेम
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा दावा आहे की प्रीमियम म्हणून भरलेल्या प्रत्येक 100 रुपयांवर शेतकर्‍यांना विक्रमी 537 रुपयांचा दावा मिळाला आहे.
सरकारचा दावा आहे की, डिसेंबर 2020 पर्यंत शेतकर्‍यांनी 19 हजार कोटीरुपयांचा विमा प्रीमियम भरला.
या बदल्यात त्यांना जवळपास 90 हजार कोटी रुपयांचा क्लेम मिळाला.

 

Web Title :- PMFBY | pmfby farmers should get crop insurance of rabi crop by 31 december 2021 know complete process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Team India South Africa Tour | द. आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का ! रोहित शर्मा दुखापतीमुळे संघातून बाहेर; प्रियांक पांचालला संधी

 

का खर्च करायचे 12 लाख, जर येथे 3.8 लाखात मिळत आहे Mahindra Scorpio, जाणून घ्या सविस्तर ऑफर

 

Pune Crime | पुण्यात तृतीयपंथी ‘आशु उर्फ आनिश’ खून, 4 तासात ‘धर्मु ठाकुर’ आणि युगल ठाकुर गजाआड