PMGKAY | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 80 कोटी लोकांना पुढील वर्षी मार्चपर्यंत मिळेल 5 किलो मोफत रेशन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PMGKAY | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय कॅबिनेटने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे पीएमजीकेएवाय (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवण्यास मंजूरी (PMGKAY) दिली आहे.

 

आता PMGKAY या योजनेंतर्गत मार्च 2022 पर्यंत लाभार्थ्यांना मोफत रेशन मिळेल. याशिवाय, कॅबिनेटने तिन कृषी कायदे माघारी घेण्यास सुद्धा मंजूरी दिली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Union Minister Anurag Thakur) यांनी म्हटले, कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की,
कोविड महामारीमुळे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत देशातील जवळपास 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

 

मागील वर्षीच केंद्र सरकारकडून या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत रेशन पुरवले जात होते.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची घोषणा मागीलवर्षी मार्चमध्ये करण्यात आली होती.
(PMGKAY) सुरूवातीला ही योजना एप्रिल-जून 2020 च्या कालावधीसाठी सुरूकेली होती.
परंतु नंतर ती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवली होती.
आता पुन्हा एकदा सरकारने ती मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

 

Web Title : PMGKAY | Modi Government extend the pm garib kalyan anna yojana to provide free ration till march 2022 says anurag thakur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Crime | धक्कादायक ! बांगलादेशातून 5 हजार मुलींना भारतात आणून वेश्या व्यवसायात अडकवलं; अखेर आरोपीला अटक

PM Kisan योजनेचा 10वा हप्ता लवकरच होईल जारी, परंतु काही शेतकर्‍यांच्या खात्यात येतील दुप्पट पैसे

Roshan Bhinder | वेब सीरिजच्या नावाखाली 37 लाखांच्या फ़सवणुकीप्रकरणी ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शिकेला अटक