PMGY | PM मोदींनी तरूणांच्या रोजगारासाठी बनवला विशेष ‘प्लान’, 100 लाख कोटींच्या गतिशक्ती योजनेची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMGY | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी देशाच्या विकासात आधुनिक पायाभूत सुविधांवर जोर दिला आणि म्हटले की, लवकरच प्रधानमंत्री गतिशक्ती – योजना (Pradhan Mantri Gatishakti-Yojana) PMGY सुरू केली जाईल. या अंतर्गत 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या योजना रोजगाराच्या संधी निर्माण करतील. प्रधानमंत्री गतिशक्ती – नॅशनल मास्टर प्लान (Pradhan Mantri Gatishakti – National Master Plan) औद्योगिक वाढीला (industrial activities) चालना देणे आणि वाहतूक व्यवस्था सुधारणारी असेल. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी भारताला ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवू.

75 व्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना मोदी म्हणाले, भारताला आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत क्षेत्रांसाठी एका एकत्रित दिशेची गरज आहे. या दृष्टीने लवकरच गतिशक्ती – राष्ट्रीय मास्टर प्लान योजना सुरू केली जाईल. विकासाला गती देण्याचा संकेत देत ते म्हणाले, आता आपल्याला पूर्णत्वाकडे जायचे आहे. 100 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या योजना तरूणांसाठी रोजगाराच्या संधी घेऊन येतील.

विकासाकडे जाणार भारत
त्यांनी म्हटले, आपल्याला अशा विकासाकडे जायचे आहे जिथे शंभर टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, शंभर टक्के कुटुंबांकडे बँक खाते असावे, शंभर टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारतचे कार्ड असावे, शंभर टक्के पात्र व्यक्तींकडे उज्ज्वला योजनेचे गॅस कनेक्शन असावे. पंतप्रधान म्हणाले, सरकार आपल्या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत गरीबांना पोषणयुक्त तांदूळ देईल.

 

तांदूळ फॉर्टिफाय करणार

त्यांनी घोषणा केली की, केंद्र सरकार आपल्या वेगवेगळ्या योजनांतर्गत गरीबांना जो तांदूळ देते, त्यास फॉर्टिफाय करेल, गरीबांना पोषणयुक्त तांदूळ देईल. रेशनच्या दुकानावर मिळणारे तांदूळ असो की मिड डे मीलमध्ये मिळणारे तांदूळ असोत, 2024 पर्यत प्रत्येक योजनेच्या माध्यमातून मिळणारे तांदूळ फॉर्टिफाय केले जातील.

पूर्वोत्तर राज्य रेल्वेने जोडणार
नॉर्थ ईस्टबाबत पंतप्रधान म्हणाले, पूर्वोत्तरमध्ये कनेक्टिव्हिटीचा नवीन इतिहास रचला जात आहे. लवकरच नॉर्थ ईस्टच्या सर्व राज्यांच्या राजधान्यांना रेल्वेने जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. आपला पूर्व भारत, नॉर्थ ईस्ट, जम्मू-काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालयाचे क्षेत्र असो, आपला कोस्टल बेल्ट किंवा आदिवासी पट्टा असो, हे भविष्यात भारताच्या विकासाचे आधार बनतील.

गावे ऑप्टिकल फायबरने जोडत आहोत
पंतप्रधान म्हणाले, देशात 110 पेक्षा जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते, रोजगाराच्या योजनांना प्राथमिकता दिली जात आहे. गावांपर्यंत रस्ते आणि वीज पोहचवण्याचे काम सुरू आहे. गावांपर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्क, डाटाची ताकद पोहचत आहे, इंटरनेट पोहचत आहे. गावे सुद्धा डिजिटल व्यवसाय तयार करत आहेत.

 

महिला गटांच्या उत्पादनांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

पीएम मोदी म्हणाले, गावात ज्या आमच्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या 8 कोटी भगिनी आहेत त्या एकापेक्षा एक प्रॉडक्ट बनवत आहेत.
त्यांच्या प्रॉडक्टला देश आणि परदेशात मोठा बाजार मिळत आहे.
यासाठी सरकार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करणार आहे.

80 टक्के शेतकर्‍यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन
ते म्हणाले, आपल्या छोट्या शेतकर्‍यांची शक्ती वाढवायची आहे.
त्यांना नवीन सुविधा द्याव्या लागतील. 80 टक्के शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे.
यापूर्वी देशात जी धोरणे होती त्यामध्ये छोट्या शेतकर्‍यांकडे लक्ष दिले गेले नाही.
आता याच शेतकर्‍यांना लक्षात घेऊन निर्णय घेतले जात आहेत.

Web Title :- PMGY | pm modi make plan to start gatishakti yojana by investing 100 lakh cr to increase jobs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi | 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन, सैनिकी शाळांमध्ये मुलींना सुद्धा प्रवेश; लाल किल्ल्यावरून PM मोदी यांनी केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा

Home Finance | आता कामगार सुद्धा खरेदी करू शकणार आपले घर, ICICI होम फायनान्सने सुरू केली ‘ऑन-द-स्पॉट’ होम लोनची सुविधा

IND vs ENG | KL Rahul वर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी फेकली दारूच्या बाटलीची झाकणं, भडकलेल्या Virat Kohli ने दिली अशी रिअ‍ॅक्शन