PMJJBY And PMSBY | ‘या’ 2 विमा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या अन्यथा होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMJJBY And PMSBY | जर तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (PMSBY) लाभार्थी असाल तर तुम्हाला 31 मे पर्यंत तुमचे बँक खाते मेंटेन करावे लागेल, कारण दरवर्षी या दोन्ही योजनांचा प्रीमियम 31 मे पूर्वी जमा करावा लागतो. त्यानंतर या दोन्ही योजनांचे पुढील वर्षासाठी नूतनीकरण होते. तुमच्या खात्यात दोन्ही योजनांचे प्रीमियम भरण्यासाठी शिल्लक नसेल, तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. (PMJJBY And PMSBY)

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक उत्तम सरकारी योजना आहे. त्याचा फायदा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या किंवा अपंग झालेल्यांना मिळतो. अशा स्थितीत त्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

 

त्याचबरोबर अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला दरवर्षी प्रीमियम भरावा लागेल, जो 31 मे पूर्वी जमा करावा लागेल. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. (PMJJBY And PMSBY)

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
त्याच वेळी, दुसरी योजना प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही सुरक्षा विमा योजना आहे. याचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला वार्षिक 330 रुपये प्रीमियम भरावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

 

18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना 1 जून ते 31 मे पर्यंत वैध आहे. त्यानंतर मे महिन्यात 330 रुपये जमा केल्यानंतर योजनेचे नूतनीकरण होते.

 

दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी भरावा लागेल प्रीमियम
या दोन्ही योजना सरकारी आहेत. जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी असाल,
तर या महिन्याच्या अखेरीस तुमच्या खात्यात प्रीमियम भरण्याची रक्कम नक्कीच ठेवा,
अन्यथा तुमच्या योजनेचे पुढील वर्षासाठी नूतनीकरण करता येणार नाही आणि तुमचे नुकसान होईल.
या दोन्ही योजनांचा प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात 342 रुपये ठेवावे लागतील.

 

Web Title :- PMJJBY And PMSBY | insurance beneficiary maintain minimum balance 342 rupee in account to renew pmjjby and pmsby

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

 

ACB Trap Pune | लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व होमगार्डवर पुणे एसीबीकडून गुन्हा दाखल

 

Latur News | लातूर जिल्ह्यातील घटना ! लग्नसमारंभात सुमारे 250 जणांना विषबाधा, वेळीच उपचार केल्याने धोका टळला