विधायक ! असहाय्य पित्याच्या हाकेला PM मोदींची ‘साद’, मुलीच्या उपचारासाठी 30 लाखांची ‘मदत’

आग्रा : वृत्तसंस्था – मुलीच्या आजारपणाच्या उपचारांच्या खर्चामुळे चिंतेत असणाऱ्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणी केली होती. पंतप्रधानांनी या असहाय पित्याची विनंती ऐकून मुलीच्या उपचारांसाठी ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ‘नॅशनल रिलीफ फंडा’ मधून ही रक्कम दिली जाणार असून जयपूर येथील सवाई मानसिंह हॉस्पिटलमध्ये या मुलीवर उपचार केले जातील.

आग्राच्या दौहरई कुबेरपूरचे रहिवाशी असणारे सुमेर सिंह यांची मुलगी ललिता सिंह ‘एनेस्थेटीक ऍनिमिया’ या रोगाने दोन वर्षांपासून आजारी आहे. ‘एनेस्थेटीक ऍनिमिया’ हा एक गंभीर आजार आहे. या आजारामध्ये शरीरामध्ये रक्त नवीन रक्तपेशी निर्माण करणे बंद करते. डॉक्टरांनी ललिताच्या ‘बोन मॅरो ट्रान्सप्लंट’साठी दहा लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. मात्र तिच्यावर उपचार करण्यासाठी परिवाराकडे तेवढे आर्थिक पाठबळ नाही. सुमेर सिंह यांनी मुलीच्या उपचारासाठी घर गहाण ठेवले आहे तसेच जमीन देखील विकली आहे.

सुमेर सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुलीच्या आजारापणावर उपचार करण्यासाठी मदत करा किंवा संपूर्ण कुटुंबास इच्छामरण घेण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी करणारे एक पत्र लिहिले होते. पंतप्रधान मोदी यांनी सुमेर सिंह यांची व्यथा जाणून घेवून ललिताच्या उपचारांसाठी ३० लाख रुपये आर्थिक मदत मंजूर केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जेलीफिशचा धोका ! रूग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षाची मागणी