home page top 1

पीएमपी बस आगीत जळून भस्मसात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – निगडी ते कात्रज या पीएमपी बसला अचानक आग लागून त्यात संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना वारजे पुलाजवळील रोझरी शाळेसमोर बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

बसचालकाने प्रसंगावधान दाखवत तातडीने बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास सांगितल्याने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

निगडी ते कात्रज बायपास ही बस सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वारजे पुलाजवळ आली असताना अचानक बोनेटमधून धूर येत असल्याचे बसचालक रमेश उगले यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बस कडेला घेऊन थांबविली व प्रवाशांना आग आग असे सांगत खाली उतरण्यास सांगितले. प्रवासीही खाली उतरले. तोपर्यंत बसने पेट घेतला होता. अग्निशामक दलाने येऊन ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती.
Loading...
You might also like