१ जूनपासून PMP चा मासिक पास आता ‘या’ नव्या स्वरुपात ; ‘हे’ आहेत वैशिष्ट्ये

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – पुण्याची लाईफलाईन असलेली पीएमपीएमएल आता नवीन तंत्रज्ञान अवलंबताना दिसून येत आहे. एक जूनपासून दर महिन्याच्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला पास आता प्रवाशांना ‘मी कार्ड’ च्या स्वरूपात मिळणार आहे. या पासची मासिक किंमत १४०० रुपये आहे. मागिल वर्षी सुमारे दोन लाख प्रवासी या पासचा वापर करतात.

अमर्यादित प्रवासासाठी हा पास फार लोकप्रिय आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात फिरण्यासाठी प्रवासी या पासचा वापर करू शकतात. या पासचे रूपांतर ‘मी कार्ड’ मध्ये झाल्यानंतर बाकी पास देखील मी कार्डच्या स्वरूपात लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी दोन्ही शहरातील ३९ केंद्रांवर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना ११८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला पास हवा आहे त्याचा फोटो आणि आधार कार्ड झेरॉक्सची एक प्रत द्यावी लागेल. हे कार्ड ऑनलाइन देखील मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

या ठिकाणी करा नोंदणी

या पासचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. www.pmpml.org या वेबसाईटवर जाऊन pass MI Card या विभागात नोंदणी करावी लागणार आहे.