PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसविना? प्रशासन, स्थायी समितीमध्ये अद्याप बोनसचा ‘प्रस्ताव’ नाही

पुणे – PMPML | पुणे महापालिका (Pune Corporation) कर्मचाऱ्यांना (pmc employees) दिवाळी निमित्त बोनस (diwali bonus) जाहीर झाला असला तरी पीएमपीच्या (PMPML) दहा हजार कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत अद्याप साधी चर्चा ही नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.

पुणे महापालिका (Pune Corporation) व शिक्षण मंडळाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीचा बोनस व सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. एवढेच नव्हे तर कोरोनामध्ये उत्तम कामगिरी बजावल्याने यंदाच्या वर्षी अतिरिक्त तीन हजार रुपये बक्षीस ही जाहीर करण्यात आले आहे. परंतु पीएमपीएमएल (PMPML) कर्मचार्यांबद्दल अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.

पीएमपीएमएल चे दहा हजार कर्मचारी आहेत. मागीलवर्षी कोरोनामध्ये बससेवा बंद ठेवण्यात आली होती. यामुळे अगोदरच तोट्यात असलेल्या पीएमपीएमएल ची अवस्था अधिकच बिकट झाली ही वस्तुस्थिती आहे. मात्र कोरोना काळात अत्यावश्यक सेवा तसेच विलगिकरण केंद्रांवर पीएमपीएमएलच्या (PMPML) कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. असे असताना पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना महापालिका दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 25 कोटी रुपयांची गरज आहे. तसे मागणीपत्रही पीएमपीएमएल ने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप त्यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली आहे. परंतु प्रशासनाने पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी प्रस्ताव स्थायी समितीकडे दिलेला नाही. तसेच स्थायी समितीने (pmc standing committee) ही यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला नाही. आजच्या बैठकी मध्ये या संदर्भातील प्रस्ताव येणार का याकडे पीएमपीएमल चे कर्मचारी डोळे लावून बसले आहेत.

हे देखील वाचा

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : PMPML | 10 thousand employees of PMPML without Diwali bonus? Administration, PMC Standing Committee has not yet ‘proposed’ the bonus

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update