PMPML | खुशखबर ! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लाखो प्रवाशांना ‘पीएमपी’ने दिली ‘ही’ विशेष सवलत, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   PMPML | पुणे (pune) आणि पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरात पीएमपी (PMPML) च्या बसमधून फिरण्यासाठीचा दैनिक पास आता केवळ 50 रुपयांत मिळणार आहे. केवळ पुणे शहरात दिवसभर फिरण्यासाठी दैनिक पास 40 रुपये तर पिंपरी चिंचवडमध्ये फिरण्यासाठी 40 रुपयांत दैनिक पास मिळणार आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकी (meeting of the Board of Directors of the PMP) नंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे पीएमपी प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने फेटाळला आहे.

गुरूवारी झालेल्या पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, नितीन लांडगे, संचालक प्रकाश ढोरे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे इत्यादी उपस्थित होते.

प्रवासी संख्या वाढेल – महापौर

बैठकीनंतर बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पीएमपीच्या दैनंदिन पासचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवासी संख्या वाढेल. पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.

 

पीएमपी संचालक मंडळाच्या या बैठकीतील महत्वाचे निर्णय (Important decisions in meeting of PMP Board of Directors)

– पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात फिरण्यासाठी पीएमपीचा दैनंदिन पास आता 70 ऐवजी अवघ्या 50 रुपयांत.

– मासिक पास 1200 रुपयांना.

– फक्त पुणे शहरात फिरायचे असल्यास 40 रुपयांत दिवसाचा पास.

– पिंपरी चिंचवड शहरात फिरायचे असल्यास दैनिक पास 40 रुपयांना.

– संचालक मंडळाने फेटाळला प्रवासी तिकिट दरवाढीचा प्रशासनाचा प्रस्ताव.

– पीएमपीच्या मिळकतींचे विकसन करण्यासाठी सर्वेक्षणास संचालक मंडळाची मंजुरी.

– डिझलेवरील बसचे सीएनजीमध्ये रुपांतर करण्यासाठी सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टचा (सीआयआरटी) अहवाल मागविण्याचा आदेश.

 

Web Title : PMPML | good news for pmp passengers in pune and pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Police News | बदली करा नाहीतर आत्मदहन, इशारा देऊन कर्मचारी ‘गायब’, पोलीस दलात प्रचंड खळबळ

National Award for Teachers | महाराष्ट्रातील ’या’ 2 शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारने होणार सन्मान

EPFO | इन्कम टॅक्सचे नवीन नियम लागू, दोन भागात विभागली जातील PF खाती