PMPML | एमएनजीएल कंपनीकडून पीएमपीच्या शिवाजीनगर आणि कात्रज डेपोतील पंपांचा गॅस पुरवठा बंद; बस सेवा विस्कळीत होणार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  PMPML | पीएमपीएमएलने सीएनजी गॅस (CNG Gas) चे 52 कोटी रुपये थकवल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. अर्थात एमएनजीएल (MNGL) कंपनीने पीएमपीच्या (PMPML) शिवाजीनगर आणि कात्रज डेपोतील (Katraj Depo) पंपांचा गॅस पुरवठा बंद केल्याने ‘पीएमपी’ची सेवा विस्कळीत झाली आहे.

पीएमपीएमएल (PMPML) कडील अनेक बसेस सीएनजी वर धावतात. एमएनजीएल कंपनी कडून या बसेसला सीएनजी पुरवठा करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील वर्षी बराच काळ बंद असलेल्या तसेच तत्पुर्वीचा संचित तोटा वाढत जाऊन तो 600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्या अनलॉक नंतर पीएमपीची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच आज एमएनजीएल ने 52 कोटी थकबाकी साठी दोन डेपोतील सीएनजी पुरवठा बंद केला आहे. संध्याकाळ पर्यंत अन्य डेपोतील गॅस पुरवठा बंद करण्याचा अलटीमेटम कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. थकबाकी वर वेळीच तोडगा न काढल्यास उद्या पीएमपीएमची सेवा विस्कळीत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

Web Title : PMPML | MNGL shuts off gas supply to PMP’s Shivajinagar and Katraj depots; Will the bus service be disrupted?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MLA Sharad Ranpise | काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार शरद रणपिसे यांची प्रकृती चिंताजनक

Pune News | प्रभाग क्र. 26 काळेपडळ परिसरामध्ये नगरसेवक भानगिरे यांच्या विकासनिधीतून विकास कामांचा शुभारंभ

OBC Reservation | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC ला 27 % आरक्षण

Tulsi Decoction Benefits | पावसाळ्यात आवश्य प्या तुळशीपासून तयार केलेला ‘हा’ काढा ! दूर पळतील आजार, मिळतील जबरदस्त फायदे

Tulsi Decoction Benefits | पावसाळ्यात आवश्य प्या तुळशीपासून तयार केलेला ‘हा’ काढा ! दूर पळतील आजार, मिळतील जबरदस्त फायदे