PMPML | पुणेकरांसाठी खूशखबर ! पीएमपीचे तिकीट आता मोबाइल ॲपद्वारे काढता येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMPML | पुणेकरांसाठी (Pune News) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बसमधून प्रवास करण्यासाठी आता मोबाइल ॲपच्या (Mobile App) माध्यमातून तिकीट काढता येणार आहे. ॲपमधून पैसे भरल्यानंतर प्रवाशांना ‘क्यूआर कोड’ (QR Code) प्राप्त होणार आहे. त्यानंतर कंडक्टर त्यांच्याकडील तिकीट मशिनच्या माध्यमातून तो कोड स्कॅन करून तिकिटाची पडताळणी करेल. दरम्यान, आगामी 15 दिवसामध्ये ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे.

देशात चालत असणाऱ्या डिजिटल व्यवहाराचा (Digital Transactions) विचार करता पीएमपीनेही तिकिटासाठी ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. पीएमपी प्रशासनाने (PMP Administration) हा प्रर्याय प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या ‘पीएमपीएमएल’ या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय दिला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. (PMPML)

दरम्यान, पुणे महानगर परिवहन महामंडळाचा वर्धापनदिन 19 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर ‘पीएमपीएमएल’ या मोबाइल ॲपचे उद्घाटन देखील याच कालावधीत करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पुणेकरांना पीएमपीएमएल ॲपमधून मेट्रोचे तिकीट काढणे शक्य, पीएमपीच्या मार्गांची सविस्तर माहिती, ॲपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील, बसचे वेळापत्रक. पीएमपीचे विविध पास ॲपद्वारे ऑनलाइन काढता येईल अशा वेगवेगळ्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

”पीएमपीएमएल’ या मोबाइल ॲपद्वारे प्रवाशांसाठी विविध गोष्टी सहज उपलब्ध होतील, असे नियोजन केले आहे. त्याद्वारे पीएमपी आणि मेट्रोचे तिकीटही काढता येणार आहे. पीएमपीच्या वर्धापनदिनी या ॲपचे उद्घाटन होईल,” असं पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा (Laxminarayan Mishra) म्हणाले.

web title : PMPML | pmpml bus tickets now booking app CMD Laxminarayan Mishra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा