PMPML | पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) पुणे स्टेशन येथील डेपोत (Pune Station) विद्युत विषयक विविध कामे करण्यासाठी स्थायी समितीने (PMC Standing Committee) मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

रासने म्हणाले, पीएमपीएमएलच्या (PMPML) पुणे स्टेशन येथील डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला (Electric Charging Station) विद्युत पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. पुढील तीन महिन्यांत ही काम पूर्ण होणे अपेक्षित आहेत.

 

कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात बॅटरी ऑपरेटर मोनोरेल
बाल चमूंचे विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प (Pune Monorail Project) कोथरुडच्या (Kothrud) तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

रासने म्हणाले, या प्रकल्पात ७२ व्होल्ट डीसी बॅटरी ऑपरेटर मोनोरेल असणार आहे. दोन बोग्या आणि चालकाच्या दोन केबिन असणार आहेत. त्यासाठी ४१० आरएमटी ट्रॅक तयार करण्यात येणार असून, सुरक्षा रेलींग, प्लॅटफॉर्म, तिकिट घर याची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कलकत्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणार्या सुमारे ५ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीला स्थायी समितीने मान्यता दिली.

 

Web Title :- PMPML | PMPML s Pune Station Depot Electric Charging Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा