पैशांची बचत आणि सुविधाही ! थेट विमानतळावरून सुरू होणार PMPML

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   जे प्रवासी विमानानं पुण्यात दाखल होतात त्यांच्यासाठी बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी पीएमपी आणि विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी 5 मार्ग प्रस्तावित असून सध्या याबाबत प्रवाशांकडून मतं जाणून घेण्यात येत आहेत.

विविध ठिकाणांवरून पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना अनेकदा विमानतळापासून इच्छित स्थळी प्रवास करण्यात अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) विमानतळावरून शहरातील काही मार्गांवर सेवा देण्यात येणार होती. याबाबत विमानतळ प्रशासनाशी चर्चा देखील झाली आहे. ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू होण्याची चिन्हं आहेत. यापूर्वीही पीएमपीकडून विमानतळापासून हिंजवडी, कोथरूड आदी मार्गांवर बससेवा देण्यात येत होती. परंतु त्यावेळी प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.

‘हे’ आहेत प्रस्तावित मार्ग

1) विमानतळ-नगररस्ता-चंदननगर-मगरपट्टा-हडपसर
2) विमानतळ-कल्याणीनगर- वाडिया कॉलेज-सेव्हन लव्हज चौक-स्वारगेट
3) विमानतळ-पुणे स्टेशन-पुणे विद्यापीठ-वाकड पूल-हिंजवडी
4) विमानतळ-पुणे स्टेशन-मनपा-डेक्कन-कोथरूड
5) विमानतळ-विश्रांतवाडी-भोसरी-पिंपरी निगडी