PMPML च्या ताफ्यात लवकरच 350 नवीन ई बसेस दाखल होणार !

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 7 डेपोंमध्ये उभारणार चार्जिंग स्टेशन्स - विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पीएमपीएमएलच्या (PMPML) ताफ्यात आणखी ३५० नवीन ई बसेस दाखल होणार आहेत. ई बसेसची संख्या ५५० वर पोहोचणार आहे. या बसेस चार्जिंगसाठी पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) हद्दीतील चार तर पिंपरी चिंचवडच्या (PCMC) हद्दीतील तीन डेपोंमध्ये चार्जींग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. पुण्याच्या हद्दीतील चार डेपोंमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने महापालिकेकडे ३० कोटी रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी दिली.

विक्रम कुमार यांनी सांगितले, की पीएमपीएमएलच्या (PMPML) ताफ्यात सध्या २०० ई बसेस आहेत. डिझेल व सीएनजीची दरवाढ होत असताना स्वस्त इंधन आणि देखभाल दुरूस्तीचा खर्च तुलनेने कमी असलेल्या पर्यावरणपूरक ई-बसेस (E Bus)किफायतशीर ठरत आहेत. लवकरच ३५० ई बसेस टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होणार आहेत. यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील सात डेपोंमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यासाठी येणार्‍या खर्चापोटी पुणे महापालिकेने (Pune Corporation) त्यांच्या हिश्श्याचे ३० कोटी रुपये द्यावेत अशी मागणी पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनाने केली आहे.

 

Web Title : PMPML’s fleet will soon have 350 new e-buses – Vikram Kumar, Pune Municipal Commissioner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PMPML चा तोटा 700 कोटी रुपयांवर पोहोचणार ! ‘आर्थिक’ उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांचा विचार सुरू

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक