PMRDA | मनपा निवडणुकीत स्वबळाचा नारा देणार्‍या कॉंग्रेसला झटका; गटातटाच्या राजकारणात PMRDA नियोजन समितीची एकमेव जागा निवडूण आणण्यात ‘अपयश’

भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेला अपेक्षित यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  PMRDA | पुरेसे संख्याबळ नसताना आणि मित्र पक्षांनाही ‘बेडक्या’ फुगवून दाखविणार्‍या शहर कॉंग्रेसला आज PMRDA नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीमध्ये भाजप (BJP), राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) जागा अपेक्षेप्रमाणे निवडूण आल्याने कॉंग्रेसला (Congress) झटका बसला आहे.

 

PMRDA नियोजन समितीच्या पुणे (PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) हद्दीतील २२ सदस्य निवडीसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली.
दोन्ही महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपच्या सदस्य संख्येनुसार सर्वच्या सर्व अर्थात १४ सदस्य विजयी झाले.
तसेच विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे त्यांच्या मतांच्या कोट्यानुसार अनुक्रमे सात आणि एक सदस्य विजयी झाले.
कॉंग्रेसकडे दोन्ही महापालिकेत मिळून जेमतेम दहा नगरसेवक असल्याने त्यांच्या मतांचा कोटा पुर्ण होणार नव्हता.
तरीही एका जागेसाठी नगरसेवक चंदू कदम (corporator chandu kadam) यांना उभे करण्यात आले होते.

 

मतांचा कोटा पुर्ण नसल्याने कदम यांचा अर्ज माघारी घेउन निवडणुक बिनविरोध करावी यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रयत्न केले होते.
कॉंग्रेसच्या एका गटाने तशी तयारीही दर्शविली होती. परंतू पक्षाच्या पदवाटपात नाराज झालेल्या एका गटाने उर्वरीत तीन मते फोडू असा दावा थेट प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करत अर्ज माघारीस विरोध दर्शविला होता.
आगामी महापालिका (Pune Corporation) निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देणार्‍या पटोले यांनीही या गटाच्या मागणीस पाठींबा देत निवडणूक लढविण्याचा निर्णय दिला.
परंतू आज प्रत्यक्षात मतमोजणीतून नाना पटोले आणि त्यांच्यासमोर दंडाच्या ‘बेडक्या’ फुगविणार्‍या कॉंग्रेस नेत्यांची क्षमता समोर आल्याची चर्चा कॉंग्रेसमध्ये सुरू झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी यातून चिंतन करावे आणि योग्य निर्णय घ्यावा.
अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे (Pimpri Corporation) पुणे महापालिकेतही (Pune Corporation) कॉंग्रेस ‘झिरो’ होईल, अशी चर्चा कॉंग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

दरम्यान, पीएमआरडीए (PMRDA) निवडणुकीमध्ये आमचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीने एकी दाखवत विजय मिळविला.
त्याचवेळी काही मंडळींच्या आत्मघातकी निर्णयामुळे मित्रपक्ष कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले.
असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी लगावला आहे.
भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर (pmc house leader ganesh bidkar) यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांची मते एकसंध राहीली
असून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाल्याची टीका केली आहे.

 

Web Title : PMRDA | A blow to the Congress, which is chanting the slogan of self reliance in the Municipal Corporation elections; PMRDA Planning Committee’s only seat in factional politics failure to get elected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Insurance | मॉडलने 13 कोटी देऊन काढला आपल्या केवळ ‘या’ विशेष अवयवाचा इन्श्युरन्स!

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 86 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही का? National Consumer Helpline वर ग्राहक करू शकतात तक्रार; जाणून घ्या प्रक्रिया