PMRDA Draft Development Plan | पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्यावरील सुनावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत; शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यासह माजी नगरसेवक अजित आपटे यांचा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMRDA Draft Development Plan | पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्यावरील (PMRDA Draft Development Plan) हरकती व सूचनांवरील सुनावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) आणि माजी नगरसेवक अजित आपटे (Ex Corporator Ajit Apte) यांच्यासह सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी पार्कचे डॉ. राजेंद्र जगदाळे (Dr. Rajendra Jagdale) यांची अशासकिय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (PMRDA)

 

तसेच तज्ञ सदस्य म्हणून निवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र रा. पवार, नगररचना विभागाचे निवृत्त संचालक सुधाकर नांगनुरे आणि भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या स्थापत्य व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. राहुल कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे ७ हजार चौ.कि.मी.हून अधिक क्षेत्रफळाचा प्रारुप विकास आराखडा (PMRDA Draft Development Plan) तयार करण्यात आला आहे. यामध्ये मागीलवर्षी पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांचाही समावेश आहे. या आराखड्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएच्या नियोजन समितीवर लोकप्रतिनिधींची नुकतीच नियुक्ती झाली आहे. परंतू आराखड्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुनावणीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली नव्हती. आज या समितीमध्ये नियोजन समितीमधील तीन सदस्य तसेच चार तज्ञ सदस्यांची नियुक्ती करून समिती गठीत करण्यात आल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे (PMRDA Commissioner Dr Suhas Diwase) यांनी कळविले आहे.

 

Web Title :- PMRDA Draft Development Plan | 7-member committee formed to hear PMRDA’s draft development plan; Shiv Sena MLA Tanaji Sawant and former corporator Ajit Apte

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा