रस्ताचे खोदकाम करुन रस्त्याचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करा, PMRDA नं दिलं पोलिसांना पत्र

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –  शिरूर तालुक्यातील करंदी फाटा राज्य मार्ग ते तळेगाव ढमढेरे या औद्योगिक क्षेञातील रस्ताने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे बारा कोटी रुपये खर्च करुन नुकतेच काम पुर्ण करण्यात आले आहे. या रस्तामुळे सणसवाडी औद्योगिक परिसरातील वाहनांना पुणे-नगर महामार्गाला पर्यायी बायपास मार्ग म्हणून चांगल्या प्रकारे वापर होत आहे.माञ सदर रस्तामध्ये श्री निवास एन्टरप्रायजेस भोसरी टाटा टेलिकाॕम केबल वर्क्स यांनी या रस्ताची साइट पट्टी ,डांबरी रस्ता खोदून विना परवाना खोदकाम करुन केबल गाडण्याचे काम सुरु केले आहे.

या बाबतीत माहीती मिळतात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांच्याकडून कार्यकारी अभियंता यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला पञ देउन संबधिताने केबल टाकताना कोणतीही परवानगी न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे, आता या बाबतीत शिक्रापुर पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे म्हत्तवाचे ठरणार आहे.