PMRDA | 23 गावांसह संपूर्ण हद्दीच्या विकास आराखड्यावर पीएमारडीएने मागविल्या हरकती सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PMRDA | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमारडीएने (PMRDA) पुणे महापालिकेत (Pune Corporation) समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांसह पीएमआरडीए (PMRDA) हद्दीचा विकास आराखडा जाहीर केला आहे. या आराखड्यावर येत्या 30 दिवसांत हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत.

नुकतेच 29 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीएमारडीएच्या (PMRDA) प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली. 30 जून रोजी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणूनही पीएमारडीएचीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज पीएमारडीए ने प्रारूप आरखडा आज मंजूर केला आहे. त्यावर पुढील 30 दिवसात नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत.

या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन येत्या काही महिन्यात विकास आराखडा मंजूर केला जाणार आहे. नागरिकांना पीएमारडीए च्या औंध येथील महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन येथील कलादालन येथे  तसेच पीएमआरडीए च्या www.pmrda.gov.in या वेबसाईटवर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना आजपासून 30 दिवसांच्या आतमध्ये पीएमारडीए च्या औंध येथील कार्यालयात महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे लिखित स्वरूपात द्याव्यात. मुदतीत प्राप्त झालेल्या हरकती सूचनांच विचारात घेतल्या जातील असे महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

23 गावांचा विकास आराखडा ठरणार ऐतिहासिक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यकाळात 2015  मध्ये पीएमारडीए ची स्थापना झाली. 2017 मध्ये पीएमारडीए हद्दीचा विकास आराखडा करण्याचा इरादा जाहीर करण्यात आला. दरम्यान डिसेंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या महाविकास आघाडी सरकारने पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीलगतची उर्वरित 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला . देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 12 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहेत. यापैकी येवलेवाडीचा आराखडा मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तर 2017 पासून पुणे महापालिका 11 गावांचा आराखडा तयार करत आहे. दरम्यान नुकतेच 30 जून रोजी 23 गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. पीएमारडीए कडून  या गावांचा तयार  विकास आराखडा महापालिकेला मिळाला आहे. त्यावर पुढील 30 दिवसांत हरकती सूचना मागवून सुनावणी होईल. यामुळे 11 गावांच्या अगोदर 23 गावांचा आराखडा मंजूर होऊन तेथील कामांना गती मिळणार आहे.

महापालिकेत यापूर्वी अर्थात 22 वर्षांपूर्वी समाविष्ट केलेल्या 37 गावांचा विकास आराखडा अद्याप पूर्णपणे मंजूर झालेला नाही. जुन्या हद्दीचा आराखडा मंजूर करण्यास विलंब झाल्याने राज्यशासनाने तो काढून घेतला होता. त्यालाही अद्याप पूर्णतः मंजुरी मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर 23 गावांचा समावेश झाल्यानंतर सर्वात कमीत कमी वेळेत आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता असून
नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना ठरणार आहे.

Web Title :  PMRDA | PMRDA solicits objections on development plan of entire boundary including 23 villages in pune corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

Lisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण, तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Shirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

Triple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ ! मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’