PMRDA – Property Cards | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच संपूर्ण करणार – शंभुराज देसाई

0
651
PMRDA - Property Cards | Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) will soon complete the process of pending property card case - Shambhuraj Desai
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PMRDA – Property Cards | पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत संपादित केलेल्या भूखंडाचे भूमापन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे प्रॉपर्टीकार्ड देण्यासंदर्भात अडचणी आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करुन प्रॉपर्टीकार्ड देण्यात येतील,” असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत सांगितले. (PMRDA – Property Cards)

याबाबत विधानसभा सदस्य महेश लांडगे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री देसाई म्हणाले, “प्राधिकरणासाठी संपादित झालेले क्षेत्र हे प्राधिकरणाच्या ताब्यात असल्यामुळे नगर भूमापन चौकशी वेळीचे मिळकत पत्रिकांवरती (प्रॉपर्टीकार्ड) मूळ धारक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांचे नाव घोषित करण्यात आलेले आहे. (PMRDA – Property Cards)

यात निवासी, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा व इतर प्रयोजनाच्या भूखंडाचा ले-आऊट मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 8 हजार 300 भूखंडांचे 99 वर्षाच्या भाडेपट्याने नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहे.याबाबत संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन ही सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येईल,” असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

Web Title : PMRDA – Property Cards | Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) will soon complete the process of pending property card case – Shambhuraj Desai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Annasaheb Patil Mahamandal | आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत – नरेंद्र पाटील

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्र साठा जप्त! दोन डिलरसह सात सराईत गुन्हेगारांना अटक, 17 गावठी पिस्टल, 13 जिवंत काडतुसांसह 24 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार

Eknath Khadse | राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेवर मोठी जबाबदारी

IND vs AUS 4th Test | उस्मान ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने रचला इतिहास; 63 वर्षांपूर्वीचा मोडला तो विक्रम

Gold-Silver Price Today | पुण्यात सोने झाले महाग; जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

Pune Crime News | नकार दिल्यानंतर सोशल मीडियावर मेसेज करुन दिला त्रास; तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल