PoK संदर्भात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले – ‘पाकव्याप्त काश्मीरचं ‘शल्य’ माझ्या मनात’

जम्मू : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजोरी येथे सीमा रेषेवरील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. त्यांनी जवानांना मिठाई भरविली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काश्मीरबाबतची आपल्या मनातील वेदना बोलून दाखविली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पाकिस्तानने अवैध रुपाने काश्मीरचा एक हिस्सा आपल्या ताब्यात ठेवला आहे. त्याची वेदना माझ्या मनात आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर आता भारताने पाकिस्तानाच्या ताब्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर ताबा मिळवावा अशी मागणी होऊ लागली आहे.

जवानांशी संवाद साधताना मोदी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर दोन्ही देश वेगळे झाले. तेव्हा आम्ही पाकिस्तानला सांगितले होते की, तुम्ही तुमच्या मार्गावर चला आणि आम्हाला आमच्या मार्गावर चालू द्या. परंतु, पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काश्मीरवर ताबा मिळविण्याचे षडयंत्र रचले.  परंतु आमच्या पायदळाने पाकिस्तानच्या स्वप्नाचा चक्काचुर केला. जम्मू काश्मीर आजही भारताचा हिस्सा आहे. परंतु, काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता. त्याची वेदना आमच्या हृदयात आहे.

Visit : Policenama.com