PMSBY | वर्षाला द्यावा लागेल फक्त आणि फक्त 12 रुपयांचा प्रीमियम, गरजेला मिळतील 2 लाख रुपये; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PMSBY | केंद्र सरकारने गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी अशी इन्श्युरन्स पॉलिसी (PM Suraksha Bima Yojana) लागू केली आहे, ज्यामध्ये दरमहिना एक रुपया म्हणजे वार्षिक 12 रुपयांचा प्रीमियम जमा करून दोन लाख रुपयांचा लाभ घेता येऊ शकतो. या प्रीमियम योजनेंतर्गत जर एखाद्या पॉलिसीधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाला किंवा त्यास अपंगत्व आले तर त्यास दोन लाख रुपयांची रक्कम मिळते. या योजनेचे नाव प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना (PMSBY) आहे, जिची सुरूवात 2015 मध्ये करण्यात आली होती.

कोण घेऊ शकतात योजनेचा लाभ

यामध्ये 18 वर्ष ते 70 वर्ष वयाचा कुणीही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. 70 वर्षाचे वय ओलांडल्यावर कव्हर संपुष्टात येईल. योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 31 मे दरम्यान प्रीमियम कापण्यासाठी खात्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाले तर पॉलिसी कॅन्सल होईल.

या योजने काय कव्हर केले जाते

PMSBY चा वार्षिक प्रीमियम अवघा 12 रुपये आहे म्हणजे दर महिना केवळ 1 रुपयांचा खर्च आहे. दरवर्षी 31 मेपूर्वी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ऑटो डिडक्ट होईल आणि 1 जून ते 31 मेच्या कालावधीसाठी कव्हर मिळेल. या स्कीममध्ये जर इन्श्युअर्ड व्यक्तीचा अ‍ॅक्सीडेंटमध्ये मृत्यू झाला पूर्णपणे अपंगत्व आले तर त्यास 2 लाख रुपयांचा अ‍ॅक्सीडेंट विमा मिळतो. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर मिळते.

 

असा करू शकता अर्ज

कोणत्याही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता. बँक मित्राची मदतही घेऊ शकता. इन्श्युरन्स एजंटशी सुद्धा संपर्क करू शकता. सरकारी आणि प्रायव्हेट विमा कंपनी एकत्रितपणे ही सेवा देतात. तुम्ही https://jansuraksha.gov.in/ वेबसाइटवर जाऊन या योजनेसाठी फॉर्म डाऊनलोड करू शकता आणि तो भरून संबंधित बँक किंवा विमा संस्थेत जमा करू शकता. एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट असल्यास केवळ एकाच अकाऊंटद्वारे या विमा योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.

 

Web Title : PMSBY | pm suraksha bima yojana annual premium coverage and how avial benefits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,233 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Beed Crime | मुलाच्या नोकरीसाठी पतीची केली हत्या; प्रियकराच्या मदतीनं पत्नीचं फिल्मी स्टाइल कृत्य

Central Railway News | मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा’ पुरस्काराने सत्कार