फायद्याची गोष्ट ! वर्षाला फक्त 12 रुपये गुंतवणूक करा अन् मिळवा 2 लाखांची पॉलिसी, घरबसल्या करा अप्लाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रत्येक व्यक्तीला विम्याचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची (PMSBY) सुरुवात केली. या योजनेंतर्गत सरकार अतिशय स्वस्त प्रीमियमसह जीवन विमा देते. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांना विमा योजनेचा लाभ दिला जातो. हा या योजनेमागचा हेतू आहे. या योजनेमध्ये वार्षिक प्रीमियम केवळ 12 रुपये असतो, म्हणजे दरमहिन्याला एक रुपया प्रीमियम येतो. या योजनेमुळे लोकांना त्यांच्या कठीण काळात मदत होऊ शकते.

इतर पॉलिसींच्या तुलनेत ही अपघात विमा योजना अत्यंत स्वस्त आहे. दुर्बल घटकातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य सुरक्षित करण्याबरोबरच त्यांना मदत मिळावी, यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. यामध्ये आपण वर्षाकाठी फक्त 12 रुपये प्रीमियम देऊन 2 लाखापर्यंत विम्याचा दावा करु शकता.

अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये विमा मिळतो

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास, एक लाख रुपयांचा कव्हर मिळतो. केवळ 12 रुपयांत पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेणे संकट काळात कुटुंबासाठी एक आर्थिक सुरक्षा उपलब्ध करतो. पूर्ण अपंगत्व म्हणजे दोन्ही डोळे, देन्ही हात, पाय गमावणं, एक डोळा हात, पाय गमावण्याच्या स्थितीतही 2 लाखांच्या मदतीची तरतूद आहे. या योजनेसाठी एनरोलमेंट पीरियड 1 जून ते 31 मे पर्यंत असतो.

कोणाला मिळू शकेल पॉलिसीचा लाभ ?

या पॉलिसीचा फायदा 18 ते 70 वयोगटातील लोक घेऊ शकतात. यात विमाधारकाच्या बँक खात्यातून दरवर्षी 12 रुपये प्रीयमियम वजा केले जातात. आपणास ही पॉलिसी आत्मसमर्पण करायची असेल तर आपण जेथे खाते आहे अशा बँकेत अर्ज देऊन आपण ते बंद करु शकता.

अर्ज कसा करायचा ?

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी पॉलिसीधारकांचे चालू बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खात्यात कमीत कमी 12 रुपये असणे आवश्यक आहे. PMSBY योजोनेसाठी क्लेम फॉर्म http://www.jansuraksha.gov.in/files/PMSBY/Hindi/ClaimForm.pdf डाऊनलोड करता येईल. हिंदी शिवाय इतर भाषांमध्ये फॉर्मसाठी http://www.jansuraksha.gov.in/Froms-PMSBY.aspx या लिंकवर क्लिक करुन फॉर्म डाऊनलोड करता येईल. तसेच 1800-180-1111/1800-110-001 या टोल फ्री क्रमांकार माहिती घेऊ शकता.