PMSBY: मे अखेर बँक खात्यातून कापले जाणार 12 रुपये; मिळेल दोन लाखाची सुविधा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाकाळात जीवन विमा, आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो हे अधोरेखित करून दिल आहे. प्रत्येक जण आता विमा घेण्याच्या मागे लागत आहे. काही विमा योजना अनेकांना फायद्याच्या ठरल्या आहेत. त्यापैकीच एक असलेली पंतप्रधान विमा सुरक्षा योजना. या योजनेचा प्रीमियम जवळ आला असून ३१ मे अखेर आपल्या बँक खात्यातून १२ रुपये कापण्यात येणार आहे. या कपातीसंदर्भात बँकांकडून ग्राहकांना मेसेज पाठवला जात आहे. शिवाय अन्य काही कम्यूनिकेशन मार्गांच्या साहाय्याने देखील बचत खातेधारकांना बँकांकडून सूचना दिल्या जात आहेत.

पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनेचा एका वर्षाचा कालावधी असून दरवर्षी हे रिन्यू केली जाते. या योजनेसाठी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यातून याच्या प्रीमियमचे १२रुपये आपोआप कापले जातात. हा प्रीमियम २५ मे ते ३१ मे दरम्यान कापले जातात. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू आणि विकलांग झाल्यास इन्शुरन्स सेवा दिली जाते.

PMSBY साठी करा ऑनलाइन अर्ज
पीएमएसबीवाय योजनेसाठी बँकेत अर्ज करून किंवा बँकेच्या नेटबँकिंगवर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज करता येतो. या योजनेचा कालावधी दरवर्षी १ जून ते ३१ मे दरम्यान असतो. या योजनेचा प्रीमियम वार्षिक १२ रुपये असून तो मे महिन्याच्या शेवटी द्यावा लागेल. विशेष म्हणजे हि रक्क्म बँक खात्यातून आपोआप वजा केली जाते. शिवाय दरवर्षी जर तुम्ही ही योजना घेतली असाल तर बँक खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

दरम्यान या योजनेचा लाभ १८ ते ७० वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. हि पॉलिसी घेतानाच तुमचे बँक खाते या योजनेशी लिंक केले जाते, त्यामुळे प्रीमियम देखील आपोआप कापला जातो. या योजनेनुसार अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्त्व आल्यास २ लाखापर्यंतची रक्कम त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यास मिळते.

जर वीम्याची रक्कम क्लेम करायची असले तर ज्या व्यक्तीचा हि विमा आहे त्या व्यक्तीला किंवा विमा घेताना ज्यांना वारसदार केले आहे त्यांना ज्यांच्याकडून तुम्ही वीमा खरेदी केला आहे त्या बँक किंवा इन्शुरन्स कंपनीकडे जावे लागेल. याठिकाणी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, यामध्ये नाव, पत्ता आणि फोन क्रमांक यांसारखी महत्त्वाची माहिती भरावी लागेल.