PMSYM | 2 रुपये खर्च करून ज्येष्ठांना होऊ शकतो मोठा लाभ ! दरमहिना खात्यात येईल इतकी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PMSYM | जर तुम्ही पीएम किसान सम्मान (PM-Kisan) निधीचे लाभार्थी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पीएम श्रम योगी मानधन योजना (pm shram yogi mandhan yojana – PMSYM) संघटित क्षेत्रातील मजूरांसाठी एक चांगली योजना आहे.

या योजनेंतर्गत फेरीवाले-विक्रेते, रिक्षा चालक, बांधकाम मजूर आणि अशाप्रकारच्या अनेक क्षेत्रातील मजूरांना आपले वृद्धत्व सुरक्षित करण्यास मदत मिळते.
योजनेंतर्गत केवळ रोज 2 रुपये बचत करून वार्षिक 36000 रुपयांची पेन्शन घेऊ शकता.

– पेन्शनसाठी करावे लागेल हे काम

या योजनेत वेगवेगळ्या वयाच्या हिशेबाने 55 रुपये ते 200 रुपये मंथली योगदानाची तरतूद आहे.
जर तुम्ही या योजनेत 18 व्या वर्षी सहभागी झालात तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 55 रुपये योगदान द्यावे लागेल.
तर 30 वर्ष वय असणार्‍यांना 100 रुपये आणि 40 वर्ष वय असणार्‍यांना 200 रुपये योगदान द्यावे लागेल.

जर 18 वर्ष वय असेल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल.
असे 42 केल्यानंतर एकुण गुंतवणूक 27,720 रुपये होईल.
ज्यानंतर प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये पेन्शन आजीवन मिळेल.
जेवढे योगदान खातेदाराचे असेल तेवढे योगदान सरकार करेल.

– असे करा रजिस्ट्रशेन

पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत रजिस्ट्रेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागेल.
यानंतर तेथे आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जनधन खात्याची माहिती द्यावी लागेल.
पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटट दाखवू शकता.
खाते उघडताना ऑनलाइन नॉमिनी सुद्धा नोंदवू शकता.

 

Web Title : PMSYM | elderly are going be bat bat after spending 2 rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्यातील घसरणीमुळे पुन्हा खरेदीची संधी, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

Vasu Paranjape | भारताने ‘द्रोणाचार्य’ गमावला; जेष्ठ प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

Bharatiya Samatawadi Party | भारतीय समतावादी पार्टीच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 15 जणांचा महात्मा बसवेश्वर क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मान