PMSYM | सरकार देतंय दरमहा 3000 रुपये, नोव्हेंबरमध्ये 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन; जाणून घ्या कुणाला मिळतात हे पैसे?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMSYM | मोदी सरकार (Modi Government) कडून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात, ज्या अंतर्गत शेतकरी, मजूर, असंघटित क्षेत्रात काम करणार्या लोकांना आणि गरीबांना आर्थिक मदत दिली जाते. पंतप्रधान श्रमयोगी मानधन पेन्शन योजना pm shram yogi mandhan pension yojana (PMSYM) यापैकीच एक आहे. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील सुमारे 46 लाख कामगारांनी रजिस्ट्रेशन केले आहे. कामगार मंत्रालयाने याबाबत वक्तव्य जारी करून माहिती दिली आहे.
2019 मध्ये सुरू झाली होती योजना
सरकारने मासिक पेन्शनच्या रूपात वृद्धत्वात सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना (PM-SYM) सुरू केली होती. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील मजूरांना 60 वर्षाच्या वयानंतर 3,000 रुपयांची किमान ठराविक मासिक पेन्शन प्रदान केली जाईल.
25 नोव्हेंबरपर्यंत 46 लाख लोकांनी केले रजिस्ट्रेशन
कामगार मंत्रालयानुसार 25 नोव्हेंबर 2021 च्या स्थितीनुसार असंघटित क्षेत्रातील एकुण 45,77,295 कामगारांनी योजनेंतर्गत नोंदणी केली आहे.
दरमहिना मिळतील 3000 रुपये
पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत (PMSMY) तुम्ही दररोज केवळ 2 रुपयांची गुंतवणूक करून वृद्धत्वात 3000 रुपये मंथली पेंशन मिळवू शकता. पेन्शनचा फायदा तुम्हाला 60 वर्षाच्या वयानंतर मिळण्यास सुरूवात होईल. या योजनेंतर्गत तुम्ही तुमचे वृद्धत्व सुरक्षित करू शकता.
18 व्या वर्षापासून करू शकता गुंतवणूक
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत व्यक्ती वयाच्या हिशेबाने गुंतवणूक करू शकते. जर तो 18 वर्षाचा असेल तर दरमहिना 55 रुपये गुंतवणूक करावी लागेल. 19 वर्षाच्या वयात दरमहिना 100 रुपये आणि 40 वर्षाच्या वयातील लोकांना दरमहिना 200 रुपयांची गुंतवणुक करावी लागेल.
सरकारने एक व्यवस्था ही सुद्धा केली आहे की, जर पेन्शन सेवा सुरू होण्यापूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाला
तर त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शनच्या 50 टक्के रक्कम मिळत राहील.
कुणासाठी लाभदायक आहे योजना
ही योजना त्या लोकांसाठी लाभदायक आहे, जे मूजर, ड्रायव्हर, हाऊस हेल्पर, चर्मकार, शिंपी, रिक्षा चालक इत्यादी
सारख्या असंघटित क्षेत्रात काम करतात. सरकारी आकड्यांनुसार, सध्या देशातील असंघटित खेत्रात सुमारे 42 कोटी लोक काम करतात.
Web Title :- PMSYM | nearly 46 lakh unorganised workers registered under pmsym scheme till 25th november 2021
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kane Williamson | केन विल्यमसनच्या नावावर आणखी एक विक्रम होण्याची शक्यता ! 66 वर्षांनंतर ‘रेकॉर्ड’?
Gold Price Today | सोन्याचे दर वधारले; जाणून घ्या आजचा भाव