PMSYM | सरकारकडून दरमहिना रू. 3000 मिळवण्यासाठी इथं 46 लाखापेक्षा जास्त लोकांनी केले रजिस्ट्रेशन, जाणून घ्या काय आहे योजना आणि कसा करावा अर्ज?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PMSYM | प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PMSYM) ही असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी एक सरकारी योजना आहे. या योजनेच्या मदतीने देशातील मजुरांना सरकारकडून दरमहा 3000 रुपये पेन्शन (Rs.3000 monthly pension) दिली जाते. 2019 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना (PM Shram Yogi Maandhan Yojana) सुरू केली होती.

 

eshram च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत (24 जानेवारी 2022) या योजनेत 46 लाख 17 हजारांहून अधिक मजुरांनी नोंदणी केली आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल सविस्तर चला जाणून घेऊया –

 

दरमहा मिळतील 3000 रुपये
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत देशातील 42 कोटी मजुरांना लाभ मिळत आहे. या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील मजूर अर्ज करू शकतात, त्यांना 60 वर्षे वयापर्यंत प्रत्येक महिन्याला 55 ते 200 रुपये हप्ता भरावा लागेल.

 

वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतरच कामगारांना पेन्शनची रक्कम मिळण्यास सुरुवात होते. या योजनेंतर्गत, वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर, मजुरांना दरमहा 3,000 रुपये म्हणजे वार्षिक 36,000 रुपये मिळतील. (PMSYM)

प्रधानमंत्री मानधन योजनेची पात्रता-

वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.

करदाते या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.

EPFO, NPS, ESIC अंतर्गत कव्हर असू नये.

अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी असावे.

अर्जदाराचे स्वतःचे बचत बँक खाते किंवा जनधन बँक खाते असणे आवश्यक आहे.

या कक्षेत रस्त्यावरील विक्रेते, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, कचारा वेचणारे, घरकामगार, धोबी, रिक्षाचालक, ग्रामीण भूमिहीन मजूर, शेतमजूर, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार इत्यादींचा समावेश होतो.

 

द्यावी लागतील ही कागदपत्रे

1. आधार कार्ड (Aadhaar Card)

2. ओळखपत्र

3. बँक पासबुक (Bank Passbook)

4. पासपोर्ट आकाराचा फोटो

5. अर्जदाराचा पूर्ण पत्ता

6. मोबाईल नंबर

 

असा करा अर्ज
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी maandhan.in/shramyogi वर लॉग इन करा.

होम पेजवर Click Here to Apply Now या लिंकवर क्लिक करा, त्यानंतर Self Enrollment वर क्लिक करा.

मोबाईल नंबर एंटर करा आणि Proceed वर क्लिक करा.

आता अर्जदाराचे नाव, ईमेल आयडी, कॅप्चा कोड भरल्यानंतर ओटीपी मिळेल, तो भरा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी प्रिंट आवश्य काढा.

 

Web Title :- PMSYM | pm shram yogi maandhan yojana pmsym you can get 3000 rupee per month check how to apply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल 22 गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक, पोलिसांना ‘संमोहित’ करुन झाला होता फरार (Video)

 

IPS Sanjay Latkar | नांदेडचे सुपुत्र आणि झारखंडचे अपर पोलीस महासंचालक संजय लाठकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर

 

Disha Patani | दिशा पटनीने समुद्रकिनाऱ्यावरील सुर्यप्रकाशातील फोटो केले शेअर