PMSYM | दररोज 2 रुपये भरा आणि मिळवा महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन; जाणून घ्या योजना

पोलीसनामा ऑनलाइन टीम – PMSYM | आयुष्यात प्रत्येकाला भविष्याची काळजी लागलेली असते. त्यातच सध्याची परिस्थिती पहिली तर प्रत्येक जण निवृत्तीनांतर जगण्यासाठी पैशाची तरतूद करण्यासाठी धडपडत असतो. आपापल्या परीने जो तो तजवीज करत असतो. मात्र असंघटित कामगारांचे तसे नसते. या क्षेत्रातील लोकांचे हातावरचे पोट असते. त्यामुळे या लोकांना धीर देण्यासाठी केंद्र सरकारने वर्षांपूर्वी एका योजना आणली. सध्या या योजनेची लोकप्रियता वाढू लागली आहे. (PMSYM)

 

असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अर्थात PM-SYM ही योजना सुरु केली आहे. २०१९ मध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन मिळावे यासाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार असंघटित क्षेत्रातील कामगारांना ६० वर्षे वयानंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देण्याची ही योजना आहे. PMSYM योजनेत आतापर्यंत ४५लाख ७७ हजार २९५ कामगारांनी नोंदणी केली आहे.

 

योजना अशी…

या योजनेसाठी दररोज २ रुपये भरल्यास वयाच्या ६० व्या वर्षी दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. वयाच्या १८व्या वर्षापासूनही या योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी दरमहा ५५ रुपये भरावे लागणार आहेत. १९ वर्षाच्या व्यक्तीला दरमहा १०० रुपये तर ४० वर्षे वयाच्या व्यक्तीला दरमहा २०० रुपये भरावे लागतील. या (pradhan mantri shram yogi mandhan yojana ) योजनेत कामगार, ड्रायव्हर, घर कामगार, चर्मद्योगातील कामगार, रिक्षाचालक आदी असंघटित क्षेत्रातील लोकांना सहभागी होता येते.

 

Web Title :- PMSYM | pradhan mantri shram yogi maandhan yojana pay 2 rupees daily get 3000 pension know about scheme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nagar Urban Co-Op Bank | रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेवर घातले निर्बंध; खातेदारांना केवळ 10 हजार रुपये काढता येणार

PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर ! 10 वा हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मोदी सरकारकडून जारी; जाणून घ्या

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय तरूणाची आत्महत्या; लोणी काळभोर परिसरातील घटना

WhatsApp Disappearing Messages | ‘हे’ फीचर कसे करते काम, असे करा Enable आणि Disable, वाढेल फोनचा स्पीड

Pune Crime | ‘चेअरमनने किया वैसाही मै करुंगा’ ! सोसायटी चेअरमनविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी केला विनयभंग

Pune Crime | ‘बर्थडे’ पार्टीसाठी 22 वर्षीय तरूणीला तळजाई जंगल परिसरात नेलं, दारू ढोसल्यानंतर युवतीला थंडी जाणवली; तिथंच साईडला झोपवून बलात्कार