देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असणाऱ्या PNB नं आपल्या ग्राहकांना दिला मोठा ‘झटका’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने आपल्या व्याजदरात 0.15% नी वाढ केली असून आता हे दर 6.80% इतके असणार आहेत. नवे दर 1 सप्टेंबर पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर बँकेचा आरएलएलआर 6.65% वरून वाढून तो 6.80% इतका झाला आहे. गृह, शिक्षण, वाहन, लघू उद्योग यांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर हे नियम लागू असणार आहेत. ते पीएनबीने आपला आधार दर 0.10% नी कमी करून तो 8.90% इतका केला आहे.

होम लोन आणि ऑटो लोन घेणं होणार महाग

पंजाब नॅशनल बँकेने वाढवलेल्या व्याजदरामुळे होम लोन आणि ऑटो लोन घेणं महाग होणार आहे. लोन EMI वर सूट मिळण्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. लॉकडाऊन नंतर RBI ने तीन महिन्यांसाठी लोन मोरेटोरियमची घोषणा केली होती, हा कालावधी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. याचिका कर्त्यांनी मागणी केली आहे की RBI ने तीन महिन्यांसाठी जी लोन मोरेटोरियमची घोषणा केली होती, ती डिसेंबर पर्यंत कायम ठेवण्यात यावी.

जून महिन्यापर्यंत एकूण 7.21 लाख कोटींचं दिलं कर्ज

मागील आठवड्यात पीएनबीचे मुख्य कार्याधिकारी एस एस मल्लिकार्जुन राव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ‘आम्ही जून महिन्यापर्यंत एकूण 7.21 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. यामध्ये एमएसएमइला 1.27 लाख कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. यापैकी 14% एनपीए आहे. आमचा असा अंदाज आहे की, 5 ते 6% कर्ज पुनर्गठीत करण्यासारखं असेल.

राव म्हणाले, कंपनी कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी व्ही कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जासाठी आरबीआयने व्ही कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. ही समिती क्षेत्र केंदित असणार की श्रेणी केंदित हे काही दिवसात समजेल. आरबीआय चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे की, समितीच्या शिफारशीनंतर 6 सप्टेंबर पर्यंत कर्जाचे पुढील नियम सांगण्यात येतील.