PNB च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी : 1 डिसेंबरपासून बँक बदलताहेत ATM शी संबंधित ‘हे’ नियम

नवी दिल्लीः  वृत्तसंस्था – देशातील दुसरी सरकारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करणार आहे. चांगल्या बँक सुविधा आणि फ्रॉड एटीएम व्यवहारापासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी पीएनबीने हे पाऊल उचलले आहे. बँक वन टाइम पासवर्ड आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली सुरू करणार आहे. ही नवीन यंत्रणा 1 डिसेंबर 2020 पासून सुरू होईल. त्याअंतर्गत तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँकेकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपीला सांगावा लागेल. हा नियम 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांना लागू असेल. ट्विटद्वारे बँकेने याबाबत माहिती दिली आहे.

पीएनबीच्या ट्विटनुसार, 1 डिसेंबरपासून दुपारी 1 ते 8 या दरम्यान, पीएनबी 2.0 एटीएममधून एका वेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढणे आता ओटीपी आधारित असेल. म्हणजेच पीएनबी ग्राहकांना या रात्रीच्या वेळी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचा मोबाईल सोबत घेऊन जावे.

जाणून घ्या काय आहे PNB 2.0
युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण करण्यात आले आहे, जे 1 एप्रिल 2020 पासून अमलात आले. यानंतर जी एंटिटी अस्तित्वात आली आहे, त्याला PNB 2.0 असे नाव देण्यात आले आहे. बँकेच्या ट्विट आणि मेसेजमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, ओटीपी आधारित रोख रक्कम फक्त PNB 2.0 एटीएममध्ये लागू होईल. म्हणजेच इतर बँक एटीएममधून पीएनबी डेबिट / एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासाठी ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा लागू होणार नाही.

कसे काम करेल ही सिस्टिम

>> पीएनबी एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँक आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल.

>> हा ओटीपी फक्त एका व्यवहारावर काम करेल.

>> या नवीन सिस्टिममधून कॅश काढून टाकण्याच्या विद्यमान प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.

>> बॅंकेचे म्हणणे आहे की, यामुळे बनावट कार्डांमधून अवैध व्यवहार रोखले जाईल.