PNB Job | पंजाब नॅशनल बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! ‘या’ पद्धतीने होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील नामांकित बँक पंजाब नॅशनल बँकेत (PNB Job) लवकरच काही जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (PNB Job) होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे. (Punjab National Bank Recruitment 2022)

एकूण जागा

सफाई कामगार (Sweeper/Cleaner) – एकूण जागा 33

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सफाई कामगार (Sweeper/Cleaner) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण (10th Passed Jobs) केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचे जास्तित जास्त शिक्षण हे 12 वी पर्यंत असणं आवश्यक आहे. त्यावरील शिक्षण असणारे उमेदवार भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत.

उमेदवारांना इंग्रजी भाषेचं वाचन आणि लिखाण इतकं मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या अधीन असलेल्या शाळेतून शिक्षण पूर्ण केले असणे गरजेचे आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यासाठी जागा रिक्त आहेत उमेदवार हे त्याच जिल्ह्याचे रहिवासी असावेत. एकूण जागांपैकी काही जागा या माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड गुणांच्या आधारे केली जाईल. (PNB Job)

वयोमर्यादा

सफाई कामगार (Sweeper/Cleaner) – ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) या जिल्ह्यांमध्ये ही पदभरती होणार आहे. या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 24 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देण्यात येणार आहे. SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी शैक्षणिक प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

Advt.

मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, फ्लॅट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व) मुंबई – 400051

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.pnbindia.in/

नोटिफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://i0.wp.com/mahasarkar.co.in/wp-content/uploads/2019/05/PNB-1.png

Web Title :-  PNB Job | 10th-pass jobs punjab national bank recruitment 2022 majhi naukari know how to apply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ONGC CMD Alka Mittal | अलका मित्तल यांच्या हाती ONGC ची कमान ! एकेकाळी ‘ट्रेनी’ म्हणून ज्वाईन केली होती सर्वात मोठी ऊर्जा कंपनी, आता बनल्या CMD

Mera Ration App | रेशन दुकान बदलायचं आहे? मग, ‘मेरा रेशन’ ॲप करा डाऊनलोड; जाणून घ्या

Food-Medication Combination to Avoid | सावधान ! जर औषधासोबत करत असाल ‘या’ 6 गोष्टींचे सेवन तर आजच थांबवा, जाणून घ्या