फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा
नवी दिल्ली : PNB Junior SF Account |पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) यावेळी तुमच्या मुलांसाठी एक विशेष सुविधा घेऊन आली आहे. या सुविधेमध्ये बँक मुलांसाठी विशेष खाते देणार आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकता. या खात्याचे नाव पीएनबी ज्यूनियर एसएफ अकाऊंट (PNB Junior SF Account) आहे. या सेव्हिंग खात्यात मुलांना लहानपणापासून बचतीची सवय होऊ शकते.
हे खाते उघडण्यासाठी फोटोसह आयडेंटिटी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफसुद्धा आवश्यक आहे. या खात्याची वैशिष्ट्य जाणून घेवूयात –
- हे खाते अल्पवयीन मुलांसाठी आहे.
- खाते मुलांचे कायदेशीर आणि नैसर्गिक आई-वडील उघडू शकतात.
- याशिवाय 10 वर्षापेक्षा मोठी मुले हे स्वता उघडू शकतात आणि ऑपरेट करू शकतात.
- यात मिनिमम बॅलन्स आवश्यक नाही.
- इनिशियल डिपॉझिट झीरो आहे.
- Minimum Quarterly Average Balance (QAB) झीरो आहे.
- 50 चेकचे चेकबुक मिळते.
- या खात्यातून NEFT ट्रांजक्शन केले तर प्रति दिन 10 हजार रुपयांपर्यंत फ्री ट्रांजक्शन करू शकता.
- शाळा आणि कॉलेजसाठी डिमांड ड्राफ्ट फ्री आहे.
- Rupay एटीएम कार्डवर ग्राहकांना दररोज 5 हजार रुपये काढता येतात.
या लिंकद्वारे घ्या खात्याची माहिती
या खात्याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pnbindia.in/pnb-junior-sf-account.html या लिंक वर व्हिजिट करू शकता. येथे खात्याशी संबंधीत सर्व माहिती मिळेल.
Mango Benefits | आंबा खाण्याचे ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे
Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य