PNB MySalary Account | तुमचे सुद्धा असेल PNB मध्ये अकाऊंट तर ‘मोफत’ मिळेल 20 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PNB MySalary Account | तुम्ही सुद्धा पंजाब नॅशनल बँकेत (Punjab national bank) खाते उघडले तर तुम्हाला पूर्ण 20 लाख रुपयांचा फायदा मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर या बँकेत खाते उघडा. या खात्याचे नाव पीएनबी माय सॅलरी अकाऊंट (PNB MySalary Account) आहे. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या खात्याबाबत जाणून घेवूयात…
PNB देते ही सुविधा
पीएनबीनुसार Salary चांगल्याप्रकारे manage करायची असेल तर PNB MySalary Account उघडा. यासोबत व्यक्तीगत अपघात विम्यासह ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधेचा लाभ मिळेल.
जाणून घ्या कसा मिळेल 20 लाखाचा फायदा
PNB आपल्या सॅलरी अकाऊंट होल्डर्सला (PNB MySalary Account) इन्श्युरन्स कव्हरसह अनेक प्रकारचे फायदे देत आहेत. झीरो बॅलन्स आणि झीरो क्वाटर्ली अॅव्हरेज बॅलन्सची सुविधा पीएनबी माय सॅलरी अकाऊंट उघडल्यानंतर ग्राहकांना 20 लाख रुपयांचा पर्सनल अॅक्सीडेंट कव्हर दिले जात आहे.
–
या अकाऊंटच्या 4 कॅटेगरी
– या खात्यात 10 हजारपासून 25 हजार प्रति महिन्यापर्यंत सॅलरी असलेल्यांना सिल्व्हर कॅटेगरीत ठेवले आहे.
– याशिवाय 25001 रुपयांपासून 75000 पगारवाल्यांना गोल्ड कॅटेगरीत ठेवले आहे.
– 75001 रुपयांपासून 150000 रुपयांपर्यंत सॅलरीवाल्यांना प्रीमियम कॅटेगरीत ठेवले आहे.
– तर, 150001 रुपयांपेक्षा जास्त सॅलरीवाल्यांना प्लॅटिनम कॅटेगरीत ठेवले आहे.
कसा मिळेल 3 लाखाचा फायदा
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. सिल्व्हर कॅटेगरीवाल्यांना 50 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याशिवाय गोल्डवाल्यांना 150000, प्रीमियमवाल्यांना 225000 आणि प्लॅटिनमवाल्यांना 300000 रुपये ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल.
या लिंकवर करा व्हिजिट
अधिक माहितीसाठी या लिंकवर https://www.pnbindia.in/salary saving products.html व्हिजिट करा.
Web Title :- PNB MySalary Account | pnb customer get 20 lakh rupees free benefits on this account check how details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Vinayak Mete | ठाकरे सरकारने महाराजांच्या स्मारकाला बंदी वासात टाकलंय का? – आ. विनायक मेटे
Kirit Somaiya | ‘दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावयांचे फटाके फोडणार’, किरीट सोमय्यांचा इशारा