PNB ग्राहकांसाठी खूशखबर ! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक आहे. पीएनबीने PNB एका वर्षाच्या एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांची कपात करत दर ७.३० टक्के केले आहेत. हे नवे दर आज अर्थात १ जूनपासून लागू होणार आहेत. बँकेने एमसीएलआर (MCLR) मध्ये कपात केली आहे. आता तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध होईल. बँकेने सोमवारी याबाबत शेअर मार्केटला माहिती दिली होती.

BMC Elections : ‘…अन्यथा महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील’ – महापौर किशोर पेडणेकर

याशिवाय सहा महिने आणि तीन महिने कालावधी असणाऱ्या एमसीएलआरमध्ये देखील ०.१० टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यानंतर व्याजदर अनुक्रमे ७ टक्के आणि ६.८० टक्के झाले आहेत. ओव्हरनाइट, एक महिना आणि तीन वर्षाच्या एमसीएलआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Supreme Court : न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले – ‘देवाकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावं’

PNB मधील सुधारित MCLR (१ जून २०२१ पासून होणार लागू)

ओव्हरनाइट- ६.६५%

एक महिना- ६.७०%

तीन महिने- ६.८०%

सहा महिने- ७.००%

एक वर्ष- ७.३०%

तीन वर्ष- ७.६०%

२०१६ पासून एमसीएलआरचा वापर सुरू करण्यात आला होता. मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स अर्थात एमसीएलआर ही आरबीआय द्वारे निश्चित करण्यात आलेली एक पद्धती आहे ज्याआधी कमर्शिअल बँका कर्जावरील व्याज दर निश्चित करतात. कोणतीही बँक एमसीएलआरवर कर्ज देते. पण बँक यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. एमसीएलआर बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त गृहकर्जाचे किंवा वाहन कर्जाचे व्याज दर असतात. अशाप्रकारे लेंडिंग रेटमध्ये कपात झाल्यामुळे MCLR संबंधित गृह आणि इतर कर्जांचा ईएमआय देखील कमी होईल. जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेतून कर्ज घेता तेव्हा बँकेकडून घेण्यात येणाऱ्या व्याजाच्या कमीतकमी दराला आधार दर म्हटलं जातं. आधार दरापेक्षा कमी दरावर बँक कर्ज देऊ शकत नाही. याच आधार दराच्या जागी बँका आता MCLR चा वापर करतात.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती