नीरव मोदीचा बंगला असा होणार उध्वस्त 

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्या प्रकरणी फरार असणाारा आरोपी नीरव मोदी याचा बंगला शुक्रवारी सकाळी डायनामाईटनं उध्वस्त करण्यात येणार आहे. आलिबागमधील किहिम समुद्रकिनाऱ्यालगतच 30 हजार चौरस फुटांवर नीरव मोदीचा अलिशान बंगला आहे. हा बंगला आता जमीनदोस्त होणार आहे. रायगड जिल्हा प्रशासनाने तशी तयारीही सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘डिमॉलिशन मॅन’ अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांच्याकडे हा बंगला पाडण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याच देखरेखीखाली डायनामाइटनं हा बंगला उध्वस्त करण्यात येणार आहे. नीरव मोदीच्या बंगल्यातील आरसीसी ड्रिलिंग खांबामध्ये ड्रिलिंग मशीनच्या साह्याने छिद्रे पाडून त्यात डायनामाइट पेरण्यात येणार आहेत. याशिवाय बंगल्यातील टाइल्स आणि प्लास्टर मंगळवारी यंत्राच्या मदतीनं उखडून काढले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिलीप जोग यांनी नीरव मोदीच्या बंगल्याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या बाजारभावानुसार नीरव मोदीच्या या अलिशान बंगल्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. याशिवाय बांधकामासाठी उच्च दर्जाच्या सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळं खोदकाम यंत्राच्या साह्यानं बंगला जमीनदोस्त करण्यात अडचणी येत आहेत असेही समजत आहे.

दरम्यान, ‘डिमॉलिशन मॅन’ अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी 2000 मध्ये भाईंदरमधील 40 अनाधिकृत इमारती स्फोटकांच्या सहाय्याने उध्वस्त केल्या आहेत. नीरव मोदीचा बंगला पाडण्याचे काम मंगळवारीही दिवसभर सुरू होतं. शितोळे हे दिवसभर त्यावर लक्ष ठेवून होते.

पिंपरी : भावानेच केले बहिणीवर कोयत्याने सपासप वार