PNB Scam | फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहक मिळेना, किंमती कमी करुन पुन्हा लिलाव; जाणून घ्या फ्लॅटची किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी (Diamond Merchant) नीरव मोदी (Nirav Modi) याच्यावर 11 हजार 500 कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळ्याचा (PNB Scam) आरोप आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी पीएनबीने नीरव मोदीच्या पुण्यातील (Pune Property) सुमारे 18 कोटी रुपयांच्या दोन मालमत्तांचा 3 फेब्रुवारी रोजी लिलाव (Auction) केला होता होता. मात्र हा लिलाव निष्फळ ठरला. मोदीची पुण्यातील ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे आता कर्ज वसुली न्यायाधिकरण प्रथमचे (DRT-1) मुंबई येथील वसुली अधिकारी आशू कुमार (Ashu Kumar) यांनी पीएनबीने (PNB Scam) दाखल केलेल्या प्रकरणात मोदीच्या दोन प्रॉपर्टीचा दर कमी करुन पुन्हा त्याचा लिलाव करण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत.

एकूण कर्ज आणि फ्लॅटची किंमत?

नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव करुन 20 मार्च 2023 पर्यंत पीएनबी (PNB Scam) बँकेला 11 हजार 777 कोटींच्या कर्जाचा (PNB Bank Loan) काही हिस्सा वसूल करायचा आहे. फेब्रुवारी पर्यंत पीएनबीचे एकूण कर्ज 11 हजार 563 कोटी होईल. ज्यामध्ये 20 मार्चला 124 कोटी रुपयांची आणखी भर पडणार आहे. लिलाव पार पडत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये पुण्यातील फ्लॅट नं. 1601 व 1602, एफ 1 इमारत 16 वा मजला, युपणे हाऊसिंग स्कीम, हडपसर (Yupane Housing Scheme, Hadapsar) येथील दोन फ्लॅटचा समावेश आहे. या फ्लॅटची किंमत अनुक्रमे 8.10 आणि 8.04 कोटी इतकी आहे. 20 मार्च पर्यंत या फ्टॅटच्या किमतीत घट करुन पुन्हा लिलाव केला जाणार आहे.

पीएनबीचे 7,029 कोटींचे कर्ज

डीआरटी ने 9 फेब्रुवारी रोजी डिफॉल्टर कंपनी स्टेलर डायमंड्स, सोलर एक्सपोर्ट्स, डायमंड आर युएस,
एएनएम एंटरप्रायजेस प्रा. लि. एनडीएम एंटरप्रायजेस प्रा. लि. यांना नोटीस पाठवली आहे.
तसेच या कंपन्यांचे मालक नीरव डी. मोदी, अमीन नीरव मोदी (Amin Nirav Modi), रोहिनी न. मोदी
(Rohini N. Modi), अनन्या नी. मोदी (Ananya Modi). अपशा नी. मोदी, पुर्वी मयांक मेहता
(Mayank Mehta), दिपक के मोदी (Deepak K Modi), निशाल डी. मोदी (Nishal D. Modi) आणि
नेहल डी. मोदी (Nehal D. Modi) यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या लोकांना पीएनबीचे 7 हजार 029 कोटी रुपयांचे कर्जदार म्हणून घोषित करुन ही नोटीस बजावली आहे.

2018 मध्ये उघडकीस आला घोटाळा

पीएनबीच्या तक्रारीनंतर सीबीआयने (CBI) 14 हजार कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळ्याचा गुन्हा
(FIR) जानेवारी 2018 मध्ये दाखल केला. त्यानंतर ईडी (ED), प्राप्तिकर विभाग
(Income Tax Department) यासारख्या यंत्रणांनी देखील यात लक्ष घातले.
केंद्रीय यंत्रणांनी या प्रकरणात नीरव मोदी आणि त्याचे नातेवाईक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) यांना
प्रमुख आरोपी असल्याचे सांगितले. नीरव मोदी सध्या लंडन येथे आहे तर मेहुल चोक्सी हा वेस्ट इंडीजमधील
(West Indies) अँटिग्वा (Antigua)आणि बार्बुडा बेटांच्या (Barbuda Island) समूहांचे नागरिकत्व घेऊन
तिथे राहत आहे. या दोघांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title :-  PNB Scam | no costomer came to buy fugitive nirav modi flat now re auction at slashed rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! आत्तेभावाच्या लग्नाला जाताना 37 वर्षीय महिलेचा अपघात; जळगावमधील घटना