कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांना करोडो रुपयांचा गंडा घालून परदेशात पळालेल्या निरव मोदी याला लंडन मधून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, काही पत्रकरांना निरव मोदी लंडनमध्ये दिसला होता त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रात सर्वात जास्त 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018 च्या जुलै महिन्यात नीरव मोदीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे अधिकारी लंडनमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणानंतर भारतीय संस्थांना लंडनच्या कायदेशीर प्रक्रियेचा अंदाज आला आहे. त्याचा फायदा नीरव मोदीच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत होऊ शकतो. त्यामुळे नीरव मोदी ला लवकरच भारताकडे सोपवलं जाऊ शकतं.

काही दिवसांपूर्वी नीरव मोदी लंडनमध्ये फिरताना दिसला होता. सध्या लंडनमध्ये तो ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो आहे, त्या अपार्टमेंटची किंमत ७० कोटी रुपये आहे. ज्याचं भाडं महिन्याला १६ लाख रुपये आहे. इंग्लंडमधील माध्यमांच्या माहितीनुसार, नीरवने पुन्हा हिऱ्याचा व्यापार सुरु केला आहे.

You might also like