बदलणार ‘या’ 3 सरकारी बँकांचं नाव, आता ग्राहकांनी ‘ही’ 5 कामे उरकण्याची आवश्यकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी),चे खातेदार आहेत तर ही बातमी महत्त्वाची आहे. कारण 1 एप्रिल 2020 रोजी केंद्र सरकार पीएनबी, यूबीआय आणि ओबीसी बँकांच्या विलीनीकरणातून तयार झालेल्या बँकेसाठी नवीन नावाची घोषणा करेल. सोबतच नव्या बँकेचा नवा लोगो जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे या बँक मर्ज झाल्यांनतर आपल्याला एक नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी मिळेल. यासाठी लक्षात घेणे गरजेचे आहे कि, तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर बँकेत अपडेट राहणे आवश्यक आहे.

ग्राहकांवर होणार ५ परिणाम : 

– तिन्ही बँक मर्ज झाल्यांनतर आपल्याला नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी  मिळू शकेल. यासाठी आपला संबंधित ई-मेल पत्ता आणि मोबाइल नंबर बँकेत अद्ययावत करणे गरजेचे आहे.

– तुमचे खाते यूबीआय किंवा ओबीसी बँकेतील आहे, तर, आपण शक्य तितक्या लवकर आपले चेकबुक बदलले पाहिजे. पीएनबी ग्राहकांनादेखील नवीन पासबुक आणि चेकबुक दिले जाणार आहे.

– ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक, आयएफएससी कोड, अलॉट केले जाईल. त्यांना ही संपूर्ण माहिती आयकर विभाग, विमा कंपनी, म्युच्युअल फंड आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ठिकाणी अपडेट करावी लागेल.

– विलीनीकरणानंतर अनेक मोठे बदल होतील. अशा परिस्थिती, आपण आपला ईसीएस बदलला पाहिजे. विमा कंपनी संपर्क करून नवीन ईसीएस जारी करणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास, आपल्याला ईसीएस संबंधित फॉर्म ऑनलाइन किंवा आपल्या शाखेत भरावा लागेल. ऑटो डेबिट किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) साठी आपल्याला नवीन एसआयपी नोंदणी आणि सूचना फॉर्म भरावा लागू शकतो. कर्जाच्या ईएमआयसाठीही तेच करावे लागेल.

– विलीनीकरणानंतर तयार केलेली नवीन बँक त्याच्या काही शाखा बंद करू शकते. कारण त्या इमारतीत किंवा जवळपास यूबीआय आणि ओबीसीची शाखा असेल तर ती त्याच शाखेत हलविली जाईल. अशा परिस्थितीत बँकेचे खर्च वाचतील. तर आपल्या शाखेचा पत्ता बदलला जाऊ शकतो. म्हणूनच आपण नवीन शाखेत लागू असलेले नवीन आयएफएससी आणि एमआयसीआर कोड लक्षात ठेवले पाहिजे कारण आपल्याला निधी हस्तांतरण आणि इतर आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असेल.