1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत

पोलिसनामा ऑनलाईन, नवी दिल्ली – देशातील वाढत्या एटीएम घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने ( PNB) मोठे पाऊल उचललंय. जर तुमचेही पीएनबीकडे ( PNB) खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. 1 फेब्रुवारी 2021 पासून पीएनबी ( PNB ) ग्राहक नॉन-ईएमवी एटीएम मशीनद्वारे व्यवहार करू शकणार नाहीत. अर्थात, या बँकेतील खातेदार ईएमव्ही नसलेल्या मशिनमधून पैसे काढू शकणार नाहीत. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेने केले ट्विट
पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केलंय की, आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी पीएनबी ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनमधून 01 फेब्रुवारी2021 पासून व्यवहार करण्यापासून बंदी घालतेय.

या बँकेने असेही म्हंटलंय की, वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेता पीएनबीने हे पाऊल उचललंय. जेणेकरून ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील. 1 फेब्रुवारी 2021 पासून ईएमव्हीशिवाय ग्राहक एटीएममधून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

जाणून घ्या, ईएमव्ही नॉन एटीएम म्हणजे काय?
ज्यात व्यवहाराच्या वेळी एटीएम कार्ड मशीनमध्ये जास्त काळ ठेवावे लागत नाहीत. यात डेटा चुंबकीय पट्टीद्वारे वाचला जातो. याशिवाय ईएमव्ही एटीएममध्ये व्यवहार होईपर्यंत काही सेकंदांसाठी कार्ड लॉक स्वरूपात ठेवावे लागते, यालाच ईएमव्ही नॉन एटीएम असे संबोधले जाते.

या बँकेनं दिलीय ही सुविधा
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना पीएनबीने अ‍ॅपद्वारे त्यांचे एटीएम डेबिट कार्ड चालू/बंद करण्याची सुविधा दिलीय. आपण आपले कार्ड न वापरल्यास आपण ते बंद करता येईल. असे केल्याने आपल्या बँक खात्यात ठेवलेले आपले पैसे सुरक्षित राहणार आहेत.