PNB Alert ! बँकेकडून ग्राहकांना इशारा, चुकूनही ‘असे’ करू नका, अन्यथा अकाऊंट होईल रिकामं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू साथीच्या आणि लॉकडाऊन दरम्यान देशातील दुसर्‍या क्रमांकाची  पीएनबी बँक (PNB-Punjab National Bank) ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना सतर्क करत लवकरच सायबर हल्ल्यासंदर्भात इशारा दिला आहे. जर ग्राहकांनी लक्ष दिले नाही तर बँकेत ठेवलेले पैसे नाहीसे होऊ शकतात. पीएनबीने अनेक शहरांतील ग्राहकांना सोशल मीडियावर पोस्ट आणि वैयक्तिक संदेशांद्वारे बनावट ई-मेल टाळावे असा सल्ला दिला आहे. यापूर्वी भारत सरकारने देखील सल्ला जारी करत मोठा सायबर हल्ला होण्याच्या शक्यतेबाबत सर्वसामान्यांना व संस्थांना इशारा दिला आहे.

एक मॅसेज खाते रिक्त करू शकतो
पीएनबीने ट्विट आणि वेबसाइटवर आपल्या ग्राहकांना सांगितले की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार देशातील बर्‍याच शहरांमध्ये मोठा सायबर हल्ला होणार आहे. विनामूल्य कोविड -19 टेस्टिंग (Free Covid-19 Testing) संदर्भात या ईमेल अ‍ॅड्रेस ncov 2019 @ gov . in वरून आलेल्या कोणत्याही ईमेलवर क्लिक करू नका.

फसवणूक करणारे या खास पद्धतीचे अनुसरण करत आहेत
पीएनबी म्हणते की हॅकर्सनी लाखो भारतीयांचे ईमेल पत्ते हस्तगत केले आहेत. ज्यावर ते विनामूल्य कोरोना चाचणीच्या नावावर ईमेल पाठवून त्यांचे वैयक्तिक आणि बँक तपशील मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद येथील लोक या फसवणूकीचे लक्ष्य आहेत. हे लोक ncov2019 @ gov . in वरून ईमेल पाठवतात. या ईमेलवर वापरकर्त्याने क्लिक करताच वापरकर्ते बनावट वेबसाइट (Fake Website) वर पोहोचतात.