SBI नंतर आता PNB नं आपल्या कोट्यवधी ग्राहकांना केले अलर्ट ! कधीही करू नका ‘या’ चूका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) आदेशानंतर देशभरातील बँका आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या बँकिंग फ्रॉडबाबत सावध करत आहेत. एसबीआयनंतर आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना बँकिंग फसवणुकीबाबत अलर्ट जारी केला आहे. काही महिन्यात बँकिंग फ्रॉडची अनेक प्रकरणे घडली आहेत. यामुळे हा अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी भारत सरकारने सुद्धा अ‍ॅडव्हाजरी जारी करून मोठ्या सायबर अटॅकची शक्यता वर्तवत लोकांना आणि संस्थांना इशारा दिला होता.

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर अनेक प्रकारच्या अलर्ट्सचा उल्लेख केला आहे. सोबतच एक ट्विट जारी करून ऑनलाइन शॉपिंग स्कॅमपासून दूर राहण्यास सांगितले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, एक छोटी चूक तुमचे संपूर्ण अकाऊंट रिकामे करू शकते. अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँकेने काही पद्धती सुद्धा सांगितल्या आहेत.

या 3 स्टेप वापरून शॉपिंग स्कॅमपासून रहा दूर :
1 कोणत्याही शॉपिंग वेबसाइटची आकर्षक डील पाहून वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करतेवेळी सतर्क रहा.
2 शॉपिंग वेबसाइटचे नाव काळजीपूर्वक पहा, दुसर्‍या वेबसाइटची कॉपी असेल तर ओपन करू नका.
3 अनेकदा फोनवर शॉपिंग वेबसाइटची अ‍ॅड येते अशाप्रकारच्या ब्राऊजरपासून दूर राहावे.

यापूर्वी सुद्धा बँकेने एक अलर्ट जारी करून ग्राहकांना बनावट कॉलपासून सावध राहण्यास सांगितले होते. बँक कर्मचारी असल्याचे सांगून काही लाक बनावट कॉल करून ग्राहकांना चूना लावत आहेत. फोनवर ते बँक खात्यासंबंधी भिती दाखवून माहिती मिळवतात आणि खात्यातून पैसे गायब करतात. अशा फसवणुकीला बळी पडू नये असे एसबीआयने म्हटले आहे.

कसे वचाल बँक फ्रॉडपासून
1 – ओटीपी, पिन, सीव्हीव्ही, यूपीआय पिन सामायिक करू नका
2 – बँक खात्यातून पैसे काढल्यास काय करावे
3 – कधीही बँकिंग माहिती फोनमध्ये सेव्ह करू नका
4 – एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती सामायिक करू नका
5 – बँक कधीही कोणतीही माहिती विचारत नाही
6 – ऑनलाईन पेमेंटमध्ये सावधगिरी बाळगा
7 – तपासणी न करता सॉफ्टवेअर स्थापित करू नका
8 – अज्ञात लिंकची तपासणी करा
9 – स्पाईवेयरपासून दूर रहा