दर 39 सेकंदाला एका मुलाचा मृत्यू होतोय ‘निमोनिया’मुळं, ‘या’ यादीत भारत दुसर्‍या स्थानी

नवी दिल्ली : वृत्तसंथा – 2018 मध्ये निमोनियामुळे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या रोगावर सध्या उपचार देखील उपलब्ध आहेत मात्र तरीही जागतिक पातळीवर 39 सेकंदाला एका मुलाचा मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात ही गंभीर बाब समोर आली आहे. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी जागतिक स्तरावर निमोनियामुळे पाच वर्षपेक्षा कमी वयाच्या 8 लाखांपेक्षा अधिक मुलांचा मृत्यू झालेला आहे याप्रमाणे सरासरी दर 39 सेकंदाला एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मृत्युमुखी पडलेल्या मुलांमध्ये जास्ततर मुले ही दोन वर्षांपेक्षा कमी वयाची होती आणि 1,53,000 मुलांचा मृत्यू तर जन्माच्या आधीच झाला होता. नायजेरियामध्ये सर्वाधिक मुलांच्या मृत्यूचा आकडा 1,62,000 इतका आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात 1,27,000 मुले, पाकिस्तानात 58 हजार, काँगोमध्ये 40 हजार, इथोपियामध्ये 32 हजार मुलांचा मृत्यू झाला आहे आणि याचे कारण केवळ निमोनिया आहे.

संक्रमण रोगाच्या शोधावर केल्या जाणाऱ्या खर्चा पैकी तीन टक्के खर्च केवळ या रोगावर केला जातो. गरिबी आणि निमोनिया यांचा देखील खूप मोठा संबंध आहे. दूषित हवा पाणी आणि आरोग्याची खबरदारी न घेतल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

निमोनियात मृत्युमुखी पडलेल्यापैकी अर्ध्या बालकांचा मृत्यू हा दूषित हवेमुळे झाला आहे. निमोनियाबाबत जागरूकता करण्याचे आवाहन युनिसेफकडून करण्यात आले आहे. पुढील वर्षी स्पेनमध्ये ग्लोबल फोरम ऑन चाइल्डहुड निमोनिया याबाबत जगभरातील नेत्यांच्या हजेरीमध्ये चर्चा केली जाणार आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like