×
Homeताज्या बातम्याPO Monthly Income Scheme | दर महिना 2500 रुपये मिळवण्यासाठी एक रक्कमी...

PO Monthly Income Scheme | दर महिना 2500 रुपये मिळवण्यासाठी एक रक्कमी किती जमा करावे लागतील; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : PO Monthly Income Scheme | वाढत्या आर्थिक असुरक्षेमुळे लोकांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते जी सुरक्षित सुद्धा असेल आणि रिटर्न सुद्धा चांगला मिळत असेल. जर तुम्ही सुद्धा अशा एखाद्या गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची (Post Office) मंथली इन्कम स्कीम (PO Monthly Income Scheme) तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. यामध्ये गुंतवणुकीवर धोका सुद्धा कमी आहे आणि रिटर्न सुद्धा चांगला आहे.

 

ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम आहे. या स्कीमद्वारे पैसे पूर्ण गॅरंटीसह परत मिळवू शकता ते सुद्धा व्याजासह

 

दरमहिना मिळतील पैसे

सध्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर मिळतो. 5 वर्षानंतर गॅरेंटेड इन्कम होऊ लागेल. याचा अर्थ आहे की, त्या व्यक्तीस वार्षिक 29,700 रुपयांचा लाभ होईल. जर महिन्याचा इन्कम पाहिजे असेल तर 2475 रुपये दरमहिना कमाई होईल.

 

केवळ 1000 रुपयात उघडता येईल खाते

ही योजना पाच वर्षाच्या लॉकइन कालावधीसह येते. किमान 1000 पासून गुंतवणूक करता येते.
यामध्ये जॉईंट अकाऊंट उघडण्याची सुविधा मिळते. ज्यामध्ये सिंगल आणि जॉईंट (3 व्यक्तींपर्यंत) दोन्ही अकाऊंट उघडता येऊ शकतात.

 

काय आहेत योजनेच्या अटी

जर खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या अगोदर खाते बंद केले तर मूळ रक्कमेतून 2 टक्केच्या बरोबरीची कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. जर खाते उघडण्याच्या तारखेच्या 3 वर्षानंतर आणि 5 वर्षापूर्वी खाते बंद केले तर मुळ रक्कमेतून 1 टक्के कपात केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल. जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर तुम्हाला योजनेचे सर्व फायदे मिळतील. (PO Monthly Income Scheme)

 

Web Title :- PO Monthly Income Scheme | post office monthly income scheme how much one lump sum will have to be deposited to get regular 2500 rupees every month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News