संतापजनक ! केरळमध्ये शिकाऱ्यांनी गर्भवती जंगली म्हशीची केली हत्या, गर्भाचे तुकडे करून वाटले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काही महिन्यांपूर्वी हत्तीच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. केरळमध्ये आता पुन्हा एकदा प्राण्यांवरील हिंसाचाराची भीषण घटना समोर आली आहे. या वेळी केरळमध्ये शिकारींनी गर्भवती जंगली म्हशीला मारून (बायसन) तिच्या पोटात संपूर्ण वाढलेल्या गर्भाचे तुकडे केले. दरम्यान काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये गरोदर हत्ती दारूगोळ्याने भरलेला नारळ खाऊन मरण पावली. जूनमधील या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. परंतु असे असूनही केरळमधील सरकार शिकारी रोखण्यात अपयशी ठरत आहे.

माहितीनुसार, शिकारींनी गर्भवती जंगली म्हशीला प्रथम गोळ्या घातल्या. त्यानंतर, तिच्या पोटातून गर्भ काढून त्याचे तुकडे केले गेले. केरळमधील मल्लापुरम जिल्ह्यातील पुंछा जंगलात ही घटना घडली. जंगली म्हशीला भारतीय गौर असेही म्हणतात. ही प्रजाती आता धोक्यात आली आहे. ही बाब वनविभागाच्या लोकांना समजताच त्यांनी शिकारी अबूच्या घरावर रेड टाकली, रेड टाकल्यानंतर अबूच्या घरातून 25 किलो मांस सापडले. यानंतर इतर शिकारींनाही अटक करण्यात आली. सुरेश बाबू, बुश्थान, अन्सिफ, आशिक आणि सुशील अशी त्यांची नावे आहेत.

स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार या 6 जणांनी पूपथिरीपारा परिसरातील खासगी मालमत्तेच्या आसपास शिकार केली होती. या 6 आरोपींनी भ्रूण कापून 200 किलो मांस काढले होते. त्यानंतर ते कापून विभागले गेले. गर्भाची डोके आणि हाडे जंगलातच राहिली होती. या जंगली म्हशीची उंची 7.2 फूटांपर्यंत जाते. त्यांचे वजन 600 ते 1500 किलो पर्यंत असते. ते ताशी 56 किलोमीटर वेगाने धावतात. वन्यजीव संरक्षण अधिनियम – 1972 अंतर्गत आता या शिकारींना किमान तीन ते सात वर्ष आणि दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.