Poco च्या ‘लेटेस्ट’ स्मार्टफोनचा पहिलाच ‘सेल’ ! 6000mAh बॅटरी + 64 MP कॅमेरा

पोलीसनामा ऑनलाइन – Poco कंपनीने मागील आठवड्यात ६०००mAh क्षमतेची दमदार बॅटरी असणारा ‘Poco X3’ हा स्मार्टफोन बाजारात आणला होता. त्याची आजपासून (२९ सप्टेंबर)
विक्री सुरु झाली असून, त्यासाठी कंपनीने खास सेलचे आयोजन केलं आहे.

सेल आणि ऑफर्स –

Poco X3 हा स्मार्टफोन आज दुपारी १२ पासून फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर ग्राहक फ्लॅश-सेलमध्ये खरेदी करु शकतील. ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज अशा तीन मॉडेलमध्ये हा फोन खरेदी करता येवू शकेल. कोबाल्ट ब्लु आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगामध्ये हा फोन मिळू शकतो. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर फोन खरेदी केल्यास ५ टक्के तात्काळ डिस्काउंट मिळतो. तसेच अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना ५ टक्के सवलत मिळते. त्याशिवाय, दरमहा १८९९ रुपयांच्या आकर्षक नो-कॉस्ट ईएमआय आणि स्टॅंडर्ड स्टॅंडर्ड ईएमआय पर्यायही ग्राहकांना उपलब्ध आहे.

स्पेसिफिकेशन्स –

या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी+डिस्प्ले सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन मिळते. ८ जीबीपर्यंत रॅमची क्षमता असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन ७३२G SoC चिपसेट मिळते. फोटोसाठी ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो शुटर असा सेटअप आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली ६०००mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये असून १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मेमरी आहे. ती २५६ जीबीपर्यंत वाढवता येवू शकते.

किंमत –

६ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज – १६,९९९ रुपये
६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज – १८,४९९ रुपये
८ जीबी रॅम + १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज – १९,९९९ रुपये