अरारारारा खतरनाक ! लोक खिल्ली उडवत गेले अन ‘टीक टीक गर्ल’ला केले टी सीरीज ने ‘लाँच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीक टॉक युजर गरिमा चौरसिया आणि तिची मैत्रीण रुगीज विनी यांनी एका गाण्यावर व्हिडीओ करत सोशलवर राड घातला होता. बोत हार्ड बोत हार्ड तु लटका के, झटका के, चलती है भटका के ध्यान मेरा ! तेरा इस चलने पे मैने कुछ लिखा है, पब्लिक को दे दूंगा ज्ञान तेरा ! असे या गाण्याचे बोल आहे. हे गाणंही प्रचंड व्हायरल झालं असून ट्रेंडिगला येऊन गेलं आहे. परंतु या मुली या गाण्यामुळे खूपच फेमस झाल्या.

गरिमाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या फॉलोवर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. तिचे इंस्टावरील फोलोवर्स तर 1.2 मिलियन झाले आहेत. गीमा आशी या नावाने गरिमा चौरसिया सोशलवर फेमस आहे. तिने अनेक ब्रँडही एंडोर्स केले आहेत. ती एका ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते आहे.

जेव्हा टीकटॉक बॅन झालं होतं तेव्हा अनेकांनी गरिमाचा चेहरा वापरुन मीम्सही बनवले होते. लोक म्हणत होते की यांच्या करिअरच्या काय होईल. अनेकांनी टर उडवली होती. परंतु टीकटॉकवरील बॅन हटले.

तम्हाला सांगू इच्छितो की, ज्या टीकटॉकमुळे लोकांनी त्यांची टर उडवली होती, त्यांच्या अ‍ॅक्टींगची खिल्ली उडवली होती त्याच टीकटॉक गर्लला आज म्युझिक कंपनी टी सीरीजने लाँच केले आहे. गरिमाचे माशाअल्लाह हे गाणं युट्युबवर रिलीज झालं आहे. हे पंजाबी गाणं असून पंजाबी सिंगर रवनीतने गायलं आहे. या गाण्याला टी सीरीजच्या पंजाबी युट्युब चॅनलने लाँच केले आहे.