Homeशहरपुणेअभिनेते मोहन जोशी आणि कवयित्री अरुणा ढेरे यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव'...

अभिनेते मोहन जोशी आणि कवयित्री अरुणा ढेरे यांना ‘वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव’ पुरस्कार जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कवयित्री डॉ. अरुणा ढेरे (poet Aruna Dhere) आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी (Mohan joshi) यांना साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव’ (vagyaine Award) पुरस्कार जाहीर झाला आहे. कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात येत्या 25 आणि 26 डिसेंबर रोजी 20 वे साहित्यिक कलावंत संमेलन होत आहे. या संमेलनात 26 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी कळवली आहे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या दोन व्यक्तींना स्व. रमेश गरवारे स्मरणार्थ वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर, कवी ग्रे, यशवंत देव, सुलोचना चव्हाण, श्रीनिवास खळे, डॉ. गिरीश ओक, जगदीश खेबुडकर, अभिनेते सयाजी शिंदे, डॉ. अच्युत गोडबोले यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि कवयित्री अरुणा ढेरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी 250 मराठी चित्रपट, 350 हिंदी चित्रपट, 50 मालिका आणि 48 नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तर ज्येष्ठ कवयित्री आणि 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी कविता, कथा, कादंबरी, ललित, समीक्षा आणि बालसाहित्यात मोठ्या प्रमाणात लिखाण केले आहे. त्यांची 40 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News