माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन , कवी वरवर राव यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी सबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी आज पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. या कारवाईदरम्यान माओवादी समर्थक विचारवंत आणि विद्रोही कवी वरवर राव यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या एका विशेष पथकाने राव यांच्या हैदराबादमधल्या घरी छापा टाकून ताब्यात घेतले.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1820757b-aaab-11e8-9be3-c3a7c5102188′]

या कारवाईनंतर मानवी हक्क समर्थकांनी राव यांच्या घरासमोर येऊन या कारवाईला विरोध केला . राव हे माओवादी समर्थक विचारवंत समजले जातात. आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या आधीही त्यांच्यावर माओवादी समर्थक असल्याचे अनेकदा आरोप झाले होते आणि प्रचंड टीकाही झाली होती. अनेक प्रकरणात त्यांनी माओवादी आणि सरकार दरम्यान मध्यस्तीही केली होती. राव यांना नामपल्लीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर पुण्याला आणण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांकडून  वेरनोन गोन्झालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड) गौतम नवलाखा अशांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली जात आहे पुणे पोलिसांनी या कारवाईला दुजोरा दिला असून सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले की, देशातील काही शहरांमध्ये पोलिसांनी सर्च सुरु केला आहे त्याबाबत मात्र त्याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.  या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अ‍ॅड़ सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती.  एल्गार परिषदेला त्यांच्यामार्फत पैसा पुरविला गेला होता तसेच राजीव गांधीप्रमाणे एखाद्या मोठ्या नेत्याची हत्या करण्याबाबत त्यांच्यात ई मेलद्वारे माहिती दिली जात होती.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44d7e13f-aaae-11e8-a325-b330280bcd18′]

त्यांच्याकडे सापडलेल्या सुमारे २०० ई मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले. वरावरा राव हे तेलंगणामधील नक्षलवाद्यांना सहानभुती असलेले प्रसिद्ध कवी आणि पत्रकार म्हणून ओळखले जातात.

पोलिसांनी  ई मेलची तपासणी करुन पोलिसांनी हैदराबाद, मुंबई, दिल्ली तसेच छत्तीसगडमध्ये या माओवादीचे थिंक टॅक असलेल्यांची माहिती घेतली . ते त्यांच्या घरी असल्याची माहिती झाल्यानंतर आज पहाटे एकाच वेळी किमान पाच ठिकाणी छापे घालून झडती घेण्याचे काम सुरु आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ : मोदी, शहा, आणि १५ मुख्यमंत्री राजधानीत..!

माओवाद्यांशी संबंध असल्याने व एल्गार परिषदेशी संबंधित असलेल्यांना यापूर्वी अटक केली असली तरी आता ज्यांच्या घराची झडती घेतली जात आहे, त्यांची एल्गार परिषद अथवा कोरेगाव भीमा दंगलीशी संबंध नसून ते बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंधित असल्याचे उघड झाल्याने त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

 या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे असून ते स्वत: हैदराबाद येथे गेल्याचे समजते.