धक्कादायक ! पोलिसांचा घ्यायचा होतो ‘बदला’, त्यामुळं ‘क्वारंटाईन’ सेंटरमधील पाण्याच्या टाकीत टाकलं ‘विष’

पंजाब : वृत्तसंस्था – भावाला अटक केल्यामुळे संतप्त झालेल्या तरूणाने त्याच्या साथीदारासह बस्ती जोधेवाल येथील कृष्णा कॉलनी भागातील क्वारंटाइन केंद्रातील पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ मिसळला. जेणेकरून ते प्याल्यामुळे शिपाई, इतर कर्मचारी आणि तेथे असलेल्या रुग्णांचा मृत्यू होईल.

ड्युटीवर असलेल्या शिपाई गुरपिंदरला याची माहिती मिळताच त्याने त्वरित पोलिसांना त्याविषयी माहिती दिली. बस्ती जोधेवालच्या पोलिसांनी शिपाई गुरपिंदरसिंगच्या तक्रारीवरून कृष्णा कॉलनी येथील रहिवासी वरींदरसिंग उर्फ नीतीका खुंसी आणि त्याचा चुहडपूर येथे राहणारा सहकारी गौरव आणि त्याची बहीण सिमरन यांच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न करण्यासह विविध कलमांत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून तिघांना एका दिवसाच्या पोलिस रिमांडवर पाठवण्यात आले आहे. पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. तपास अधिकारी एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपी वरींदरचा भाऊ जतिंदरसिंग याच्यावर दरोडे व त्याचे नियोजन यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी आरोपी जतिंदरला अटक केली होती, त्या पथकात शिपाई गुरपिंदर देखील होता. गुरपिंदरची ड्युटी कृष्णा कॉलनी परिसरातील क्वारंटाइन केंद्रात होती. आरोपी वरींदरने शिपाई गुरपिंदरकडून बदला घेण्याचे ठरवले. त्याने त्याच्या दोन साथीदारांसह त्याच्या हत्येचा कट रचला. एवढेच नव्हे तर आरोपींनी क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या रूग्णांना देखील सोडण्याचा विचार केला नाही.

आरोपींनी क्वारंटाइन केंद्रातील पाण्याच्या टाकीत विषारी पदार्थ टाकला. शिपाई गुरपिंदरसिंग जेव्हा पाणी पिण्यासाठी गेले, तेव्हा वास येत होता. त्याची तब्येतही खराब होऊ लागली. त्याने सहकारी कर्मचार्‍यांना सांगितले असता आरोपी छतावर असल्याचे समजले. तपासात समोर आले कि, आरोपींनी पाण्यात विषारी पदार्थ टाकला होता कारण, वरींदरचा भाऊ जतिंदर याला अटक करणारा शिपाई गुरपिंदर याचा मृत्यू होईल. एएसआय राधेश्याम यांनी सांगितले की, आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस रिमांडवर घेण्यात आले आहे. तपास सुरू असून चौकशी केली जात आहे.