खळबळजनक ! संपूर्ण कुटुंबाचा सूड घेण्यासाठी माथेफिरून टाकले विहिरीत विष

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या सुडाने पेटलेल्या एका माथेफिरूने विहिरीत विष टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विहीर मालकाला वेळीच हा प्रकार समजल्याने कुटुंबासह जनावरांचेही प्राण वाचले.

शांताराम बोरसे हा शेतकरी आपल्या कुटुंबियांसोबत साकोरा गावात राहतो. त्यांच्याकडे गायी व बैल आहेत. दरम्यान शेतातील विहीरीला सध्या पाणी असल्याने ते पिण्यासाठी व जनावरांना पाजण्यासाठी वापरले जाते. त्यानुसार ते जनावरांसाठी पाणी आणायला गेले होते. त्यावेळी पाण्यात फेस आल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा प्रकार समोर आला. दरम्यान त्यांच्या कुटुंबाला संपविण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केले गेल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांनी लागलीच नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading...
You might also like